दुसरे रत्न आहे विसरा. दुसऱ्यावर केलेले उपकार विसरा. फळाची अपेक्षा करु नका. 'निःस्वार्थ' भावना ठेवा. तिसरे रत्न-विश्वास. नेहमी 'स्वकष्ट' आणि 'ईश्वरावर' अतूट विश्वास ठेवा. हीच तुमच्या यशाची पावती असेल.
चौथे रत्न आहे नातं. समोरच्याच्या मनाची काळजी आपण आपल्या मनापेक्षा जास्त घेतल्यावर जे निर्माण होत ते नातं नात्याला जपा, नात्यांना तडा जावू देवू नका. पाचवे रत्न म्हणजे दान. नेहमी सढळ हाताने दान करा, दान केल्याने धन कमी होत नाही उलट दान केल्याने मिळतो मान आपले मनच आपल्याला दानशूर ही पदवी बहाल करतं
सहावे रत्न आहे आरोग्य. दररोज व्यायाम करा, योगासने करा, झुंबा करा, चालणे ठेवा आणि आपले जीवन निरोगी ठेवा. आणि सातवे रत्न आहे वैराग्य. नेहमी लक्षात ठेवा की, 'जन्म' आणि 'मरण' कधीच कुणालाच चुकलेले नाही. 'जन्म' घेतला म्हणजे 'मृत्यु' अटळ आहे. वर्तमानात जगा. कोणत्याही गोष्टींचे दुःख कुरवाळित बसू नका. 'जीवन' खूप सुंदर आहे, आनंदाने जगा..
माणूस जसा बदलत चालला आहे,तसा निसर्ग देखील बदलत चालला आहे. निसर्गाची ताकद आहे बघा निसर्गातील एक विषाणू सांगून गेला, पैसा, संपत्ती, गाडी,बंगला,सोने, श्रीमंती याहीपेक्षा आपला जीव महत्त्वाचा आहे.

No comments:
Post a Comment