कला, वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये अर्थशास्त्र अवघड असल्याचा गैरसमज असतो. मात्र, हा विषय सोपा असून मानवी जीवनात अर्थशास्त्राला खूप महत्त्व आहे. अर्थशास्त्रात मानवांचे जगणे, जीवन समृद्ध व आनंददायी करण्याची क्षमता आहे. अर्थशास्त्ररूपी मित्र जगण्याला अर्थ पूर्ण करू शकतो. अर्थशास्त्रातील पदवी, पदव्युत्तर शिक्षण तसेच सेटनेट, पीएच.डी. केल्यास उत्तुंग यश मिळवता येते.
अलीकडे त्यातही कोरोनासारख्या महामारीच्या पार्श्वभूमीवर जागतिक व राष्ट्रीय पातळीवर अर्थकारण कोलमडत असताना ते सावरण्याची ताकद अर्थशास्त्रामध्येच आहे. शासन पातळीवर कररचना व कर आकारणी करण्यासाठी अर्थशास्त्रीय ज्ञानाची नितांत गरज आहे अन्यथा सरकार नावाच्या यंत्रणेला अपयश येते. देशांतर्गत भाववाढीची, महागाईची समस्या निर्माण होते यासाठी शासनाला जबाबदार धरले जाते. शेतीशी संबंधित प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी कृषी अर्थशास्त्र अभ्यासकांची गरज सातत्याने भासते.
कशाचा अभ्यास कराल? - अर्थशास्त्रातील मुख्य दोन अभ्यास शाखा आहेत. ९. सूक्ष्म अर्थशास्त्र (Micro Economics) आणि २. समग्र अथवा स्थूल अर्थशास्त्र (Macro Economics) , व्यक्तिगत पातळीवरील खर्च, उत्पन्न, बचत, गुंतवणूक, उपभोग याद्वारे मागणी पुरवठ्यातील बदल याच्याशी सबंधित अर्थविषयक समस्याचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्भ्यासविषय आहे. तर राष्ट्रीय सकल उत्पन्न, उत्पादन, व्यापार, व्याजदर, चलनवाढ, भाववाढ, आंतरराष्ट्रीय व्यापारी संबंध यांच्याशी संबंधित घटक स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यासले जातात.
व्यक्तीच्या, कुटुंबाच्या, उद्योग-व्यवसाय संस्था आणि देशाच्या दष्टीने दोन्ही शाखाचा अभ्यास हा तितकाच महत्त्वाचा आहे. पदवी आणि पदव्युत्तर पदवी स्तरावर आपण योग्य विषयाची विशेष विषय म्हणून निवड केली पाहिजे. अर्थशास्त्र, कृषी वित्त पुरवठा, सहकार, विकास व नियोजनाचे अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था, आयात-निर्यात व्यापार, उपयोजित अर्थशास्त्र, ग्रामीण अर्थव्यवस्थेचे अर्थशास्त्र, श्रम-श्रमिकांचे अर्थशास्त्र, व्यवस्थापकीय अर्थशास्त्र, गुंतवणुकीचे अर्थशास्त्र, सार्वजनिक अर्थशास्त्र, इकॉनोमीट्रिक्स, सांख्यिकी अर्थशास्त्र, या आणि अशा काही महत्त्वाच्या शाखांसोबत जवळपास पंचवीस विषयशाखांचा अभ्यास करता येतो, समभाग बाजार, भांडवल बाजार, नाणेबाजार, बॅकिंग, शासकीय धोरणे व निर्णय, आर्थिक संक्रमणावस्था, वित्तीय विश्लेषण, धोरण विश्लेषक आदीं विषयांमध्ये प्रावीण्य संपादत करून यशस्वी करिअर घडविता येते.
कोणत्या क्षेत्रात मिळतील संधी? अर्थशास्त्रात पदवी, पदव्युत्तर पदवी, नेट - सेट, पीएच.डी. करून महाविद्यालयात, विद्यापीठामध्ये अर्थशास्त्राचा अध्यापक - संशोधक म्हणून नोकरी करता येते.
बॅंकांमध्ये नोकरीची संधी - सेबी, इंडियन बँक असोसिएशन, नॅशनल हाउसिंग बोर्ड, आयात-निर्यात बँक, सहकारी बँकात नोकरीच्या उत्तम संधी मिळतात, अर्थशास्त्रासोबत विधी, व्यवस्थापन, पर्यावरण, उत्पादन, वित्तीय संबंध यातील पदवी असेल तर ते पूरक ठरते.
अर्थतज्ज्ञांची बाजारपेठांना गरज- अर्थशास्त्रातील संशोधन जागतिक पातळीवर दखलपूर्ण ठरते. जगभरातील कॉपोरेट हाउसेसमध्ये त्यांचे उत्पादन, विक्री, नफा, सामाजिक दायित्व, कामगारांचे प्रश्न, बाजारातील चढ-उतार यांचे विश्लेषण करण्यासाठी अर्थशास्त्राचे उत्तम ज्ञान असणारे विश्लेषक हवे असतात.
आयएफएस, रिझर्व्ह बँक, जागतिक बॅकेत करिअर - शासनाच्या ध्येयधोरणाच्या निश्चितीमध्ये आपला सहभाग असावा, तसेच सरकारी, उत्तम पगार आणि मानसन्मानाची नोकरी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना IFS (Indian Economic Services) या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नशीब अजमावता येते.
अर्थशास्त्र, सांख्यिकी अर्थशास्त्र, इकॉनोमॅट्रिक्स, संशोधनाची आवड असणार्यांसाठी भारतीय रिझर्व्ह बॅकेत विद्यार्थीदशेपासूनच संधी आहेत, पदव्युत्तर पदवी करताना आरबीआयची 'यंगस्कॉलर'ची स्पर्धा परीक्षा देऊन धेट रिझर्व्ह बॅकेच्या सेवेत पहिल्या टप्प्यावर दाखल होण्याची सधी असते, याशिवाय आरबीआयच्या द्वितीय श्रेणीतील नोकरीच्याही संधी खास अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यासाठी असतात. याशिवाय आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, पुननिर्माण आणि विकासासाठीची आंतरराष्ट्रीय बँक (जागतिक बॅक) यांच्याही सेवा क्षेत्रात जाण्याच्या संधी अर्थशास्त्राची जागतिक आर्थिक प्रश्नांची आंतरराष्ट्रीय सबंधीची जाण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असते.
अर्थशास्त्र शिक्षणासाठी सुप्रसिद्ध संस्था-
● टाटा समाज विज्ञान संस्था, चेबूर, मुंबई ●मुंबई स्कूल ऑफ इकॉर्नोमिक्स , मुंबई विद्यापीठ ● जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली ● दिल्ली स्कूल ऑफ इकॉर्नोमिक्स, दिल्ली विद्यापीठ, नवी दिल्ली ● मद्रास ऑफ इकॉर्नोमिक्स , मद्रास ● इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च, मुंबई ● इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, ● बनारस हिंदू विद्यापीठ ● शांतिनिकेतन, कोलकाता ● सरदार पटेल श्रम विज्ञान संस्था ● कृषी संशोधन व विकास संस्था, बंगळुरु ● जागतिक पातळीवरही ऑक्सफर्ड, केंब्रिज, कोलंबिया, लंडन स्कूल ऑफ इकॉर्नोमिक्स
विधी क्षेत्रातही मिळेल यश
आज आपल्याभोवती गुव्हेगारीही वाढलेली दिसते. यासाठी विधी पदवी व अर्थशास्त्र सोबतीने केल्यास आर्थिक खटले उत्तम प्रकारे चालवता येऊ शकतात.
