बहुतांश लोक अपयशी होतात,त्याला ते स्वतः जबाबदार असतात, कारण त्यांनी स्वतः ला बदललेले नसते.त्यांना स्वतः मध्ये बदल करावासा वाटत नाही. पण खरे वास्तव असे की, परिवर्तनाशिवाय यश हाताला लागत नाही. परिवर्तनामुळे आपल्या आयुष्याला फायदा होतो. काही माणसे खड्ड्यात असतात. खड्डा खोदण्याचे काम करीत असतात. ते आपल्या कामाची पद्धत बदलत नाहीत. त्यामुळे ते अडचणीत सापडू शकतात. काही माणसे आपल्या आपल्या म्हणण्यावर ठाम असतात.त्यांना बदल नको असतो.
Thursday, May 28, 2020
Tuesday, May 26, 2020
चुका झाल्यावर काय करायचं?
म्हटलं जातं की मनुष्य प्राणी हा चुकांचा पुतळा आहे. चुका त्याच्या हातून होणार नाहीत तर कुणाच्या हातून होणार? परंतु, चुका झाल्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती जो सुधारतो,तोच जीवनात यश प्राप्त करू शकतो.त्यामुळे चूक झाली म्हणून घाबरू जायचं नाही किंवा हताश व्हायचं नाही.परिस्थितीला सामोरे जाऊन चूक का झाली, याचा अभ्यास करायचा, त्याची कारणमीमांसा शोधायची.असे केल्याने पुन्हा कधी चुका होणार नाहीत.
Sunday, May 24, 2020
चांगला लीडर हृदयातून बोलतो,हृदयात उतरतो
माणसं नेहमी विचारतात की, एक चांगला वक्ता आणि चांगला लीडर यांच्यात काय फरक आहे? त्यांच्यात अंतर असतं मानसिकतेचं! एका चांगल्या वक्त्याचे अस्त्र-शस्त्र फक्त शब्द, त्याचे विचार असतात.पण एक चांगला लीडर सर्वात पहिल्यांदा शब्द आणि विचारांचा आपल्या जीवनात अंगीकार करतो आणि त्यानंतरच तो दुसऱ्यांना अंगीकार करायला सांगतो. तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का बघा!तुम्ही ती तुमच्या लहानपणी ऐकली असेल. एक स्त्री आपल्या मुलाला घेऊन महात्मा गांधीजींकडे घेऊन जाते.
Saturday, May 23, 2020
यशासाठी पहिल्यांदा स्वतः ला 'इम्प्रेस' करा
जे व्यक्तिमत्त्व दुसऱ्याला खऱ्या अर्थानं प्रभावित करतं, त्यानं पहिल्यांदा स्वतःला प्रभावित करण्याचा सराव केलेला असतो. हा सराव अशा सवयींचा आहे, जी आपली मानव होण्याची निशाणी आहे. या सवयीच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असते, म्हणजे यशस्वी आणि श्रेष्ठ जीवन जगण्यासाठी आपल्याला आपल्या काही खास सवयींवर काम करावं लागेल. कोणत्याही व्यक्तीची ओळख त्याच्या मूळ स्वभावामुळे होते.
शंका घेतला की मिळणार नाही यश
जीवनात पुढं जाण्यासाठी माणूस प्रयत्न करत असतो आणि या प्रयत्नांवर शंका घेतल्यानं सगळ्या प्रयत्नावर पाणी फिरतं. शंका माणसाचा उत्साह कमी करतं. शंकेमुळे माणूस योग्य वेळ येण्याची वाट पाहात राहतो. त्याला वाटतं की, योग्य संधी आल्यावर आपण काम करू. जी माणसं आपल्या योग्यतेवर शंका घेतात, ती माणसे नेहमी द्विधा मनस्थितीत असतात. काम सुरू करू का नको, असे शंकाकारी प्रश्न त्यांच्या मनात सतत घोळत असतात. ही माणसं सतत काम टाळत असतात. त्यांना नेहमी वाटत राहतं की, अजून योग्य वेळ आली नाही. ते आपली दिशा निश्चित करू शकत नाहीत आणि मग ते इकडे-तिकडे वायफट भटकत राहतात.
प्रिय व्यक्तीपासून दूर राहिल्यानं प्रेम वाढतं
नात्यामध्ये प्रेम असायला हवं,पण एकमेकांशी सतत जोडून राहणं चुकीचं आहे. अशा परिस्थितीत नातेसंबंधावर त्याचा परिणाम होतो. आपसातील ओढीवर त्याचा परिणाम होऊन असं वाटायला लागतं की, नातं फक्त निभावलं जात आहे. आपल्या नात्यांमध्ये अगदीच जवळीक निर्माण करायची असेल तर अधे-मधे त्यातील दुराव्याचा स्वाददेखील चाखला पाहिजे. अमेरिकेतील वर्तणूक विज्ञानाचे शास्त्रज्ञ डॉ. जोसेफ जे प्लाउड म्हणतात की, आपल्याला वाटत असतं की, आपली प्रिय व्यक्ती सतत आपल्यासोबत राहायला हवी. पण यात आपण इतके गंभीर होतो की, त्याला अप्रिय बनवून टाकतो. सोबत राहून व्यक्तिस्वातंत्र्य मिळत नसेल तर नात्यात बिघाड निश्चित मानायला हवं.
Thursday, May 21, 2020
निर्णय घेताना 'आतला आवाज' ऐका
आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात असे खूप काही क्षण येतात की, आपल्याला पटकन निर्णय घेणं भाग असतं. अशा वेळेला निर्णय चुकीचा आहे की बरोबर आहे, याला महत्त्व नसते, निर्णय घेतला जाणं महत्त्वाचं असतं. जर तुम्ही योग्य वेळेला निर्णय घेतला नाहीतर तुम्ही अनेक संधीला मुकाल. यामुळे दोन प्रकारच्या शक्यता आहेत. एक तर तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर तुमचा फायदाच होईल आणि दुसरे म्हणजे तुमचा निर्णय चुकला असेल तर तुम्हाला त्यातून एक शिकवण मिळेल, जी तुमच्या पुढच्या निर्णयाला उपयोगाची ठरू शकते. आयुष्य छानपैकी जगायचं असेल तर निर्णय घेण्याची कला आत्मसात केली पाहिजे. यासाठी काही खास प्रयत्न करणे गरजेचे आहे.
Wednesday, May 20, 2020
वेळ वाया घालवू नका, त्याच्यावर छाप सोडा
जर वेळ खूपच मर्यादित आहे आणि ते तुमच्या कंट्रोलमध्ये नाही , असे तुम्हाला वाटत असेल तर त्याचे योग्य असे प्लानिंग करा. नाही तर वेळ वाळूसारखी तुमच्या हातून निसटून जाईल. जर तुम्ही वेळेची पर्वा केली नाहीतर हीच वेळ तुम्हाला त्रासही देऊ शकते. वेळेला योग्य प्रकारे मॅनेज करायला हवं, तेव्हाच तुम्ही जीवनाचा आनंद लुटू शकाल. सध्याच्या प्रत्येक क्षणाचा योग्य वापर करत राहिलात तर भविष्य तुमच्यासाठी सुंदर असेल. आपण इथे हेच पाहणार आहोत की, वेळेचा उपयोग आपल्या फायद्यासाठी कसा करायचा.
इतिहास पाठ नाही करायचा,रचायचा!!
या जगात दोन प्रकारची माणसे असतात. त्यातले एक असतात, ते आयुष्यभर इतिहास पाठ करत असतात. पण दुसऱ्या प्रकारचे लोक आपलं संपूर्ण आयुष्य इतिहास रचण्यात घालवत असतात. आपण कोणत्या प्रकारचा इतिहास घ्यायचा, हे आपल्या हातात आहे. बघा, अशी कोणती गोष्ट आहे, जी लोकांना इतिहास बनवायला विवश करते? अशी कोणती शक्ती आहे, जी तुम्हाला दुसऱ्यांपेक्षा वेगळं बनवते? जिद्दी माणूसच इतिहास रचत असतो.
एकाग्रतेने होते काम
अनेक लोकं स्वतः विषयी तक्रार करत असतात. त्यांना कुठल्याच गोष्टीत एकाग्र होता येत नाही. त्यांचं मन भटकत राहतं. एक गोष्ट मात्र खरी आहे, ती म्हणजे, माणसानं एकाद्या गोष्टीवर एकाग्र होऊन काम केलं की, त्याचं यश निश्चित आहे. एकाग्रतेसाठी माणसाला आपल्या मनाला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. एकाग्रतेसाठी सराव आवश्यक आहे, अभ्यास गरजेचा आहे. यानंतर मात्र मग कुठली समस्या येणार नाही.
कित्येक विद्यार्थ्यांच्याबाबतीत घडतं की, ते पुस्तक उघडून बसतात. काही वेळ वाचतात आणि मग मन भटकायला लागतं. ते विषयाच्याबाबतीत एकाग्र होऊ शकत नाहीत.
Subscribe to:
Posts (Atom)









