या जगात दोन प्रकारची माणसे असतात. त्यातले एक असतात, ते आयुष्यभर इतिहास पाठ करत असतात. पण दुसऱ्या प्रकारचे लोक आपलं संपूर्ण आयुष्य इतिहास रचण्यात घालवत असतात. आपण कोणत्या प्रकारचा इतिहास घ्यायचा, हे आपल्या हातात आहे. बघा, अशी कोणती गोष्ट आहे, जी लोकांना इतिहास बनवायला विवश करते? अशी कोणती शक्ती आहे, जी तुम्हाला दुसऱ्यांपेक्षा वेगळं बनवते? जिद्दी माणूसच इतिहास रचत असतो.
माणसाने आपली जिद्द कायम ठेवली तरच भलं आहे,कारण इतिहास रचणाऱ्यांना कधी ना कधी राग आलेलाच असतो, आणि त्याचे रुपांतर जिद्दीत झालेले असते. त्यामुळेच संकल्प केला गेलेला असतो. तुम्ही हा विचार स्वीकारला पाहिजे की, मला काही तरी खास हवं म्हणजे हवं. हा विचार एकदा पक्का झाला की, तुम्ही अर्धी लढाई जिंकल्यात जमा आहे.सचिन तेंडुलकरचे करिअर त्याच्या हाताचा कोपरा दुखापतग्रस्त झाला, तेव्हा धोक्यात आले होते. पण त्याने मनाशी चंग बांधला की, आपल्याला अशाप्रकारे रिटायर्ड व्हायचं नाही. आज त्याच्या नावावर 100 शतकांचा विक्रम आहे.
स्वातंत्र्य हेच मोटिवेशन
एन्टरप्रेन्योर्सला कोणती गोष्ट मोटिवेट करते? काही लोक असा विचार करतील की, पैसा मोटिवेट करतो. पण जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की, पैसा फक्त कष्टाचे आऊटकम आहे. मनापासून मेहनत केली असेल तर पैसा आपोआप येतोच. स्वतंत्रपणे काम करणं, आपल्या विचारानं काम करणं, आपल्या पद्धतीने गोष्टी करणं, हेच स्वप्न असतं एन्टरप्रेन्योरचं. जर इतिहास रचायचा असेल तर जिद्दी असायलाचं हवं.
क्रिएटिव्ह विचारांच्या पुढे जा
यशाच्या वाटेत अनेक प्रकारचे अडथळे येत राहतील. आणि ती फक्त क्रिएटिव्ह विचाराने पार केले जाऊ शकतात, असे खूपदा कमीच पाहायला मिळते. तुम्ही कित्येकदा पाहिलं असेल की, जीवनात काहीतरी मोठं करायसाठी काही लोक कसल्या तरी वाईट पद्धतीची नाही निवड करत नाहीत. तर आपल्या प्रतिभेचा उपयोग करत सातत्याने मेहनत करून यश मिळवतात.
तुम्ही रचू शकता इतिहास
माणसाने आपली जिद्द ओळखली पाहिजे. कारण इतिहास रचणारे शंभर टक्के योगदान देत असतात. काही लोक बिल गेट्सच्या बाबतीत म्हणतात की, ते तर ड्रॉपआऊट होते, पण त्यांना ओळखणाऱ्या लोकांना विचारा, त्यांच्याइतके वाचन आज कोणीच करत नाही. आजदेखील ते रोज 500 पानं वाचतात. सत्य नडेला यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते लॅबमध्येच झोपतात. ज्यामुळे वेळ वेळ वाचवून आणखी अधिक शिकायला मिळावं. जर तुमचे ध्येय स्पष्ट असेल तर पूर्ण ताकदीने काम केल्याने तुम्ही इतिहास रचण्याच्या जवळ पोहचू शकता.
यश म्हणजे सर्वश्रेष्ठ बदला
एकदा रतन टाटा आपले पॅसेंजर व्हीकल डिव्हिजन,जी नुकसानीत चालली होती, तिला विकण्यासाठी फोर्ड कंपनीचे संचालक बिल फोर्ड यांच्याकडे गेले होते. त्यांनी टाटांचा अपमान केला. बिल म्हणाला, मी ही खरेदी केली तर तुझ्यावर उपकारच केल्यासारखे आहे. जर धंदा करायलाच येत नाही तर सुरूच का केलंस. ही गोष्ट रतन टाटांच्या मनाला बोचली. त्यांनी पॅसेंजर व्हीकल फायद्यात आणणारच ,ही जिद्द मनाशी बांधली. त्यांनी आणखी मेहनत केली. यादरम्यान बिल फोर्ड याची कंपनी घाटयात आली होती. त्यांची जैगुआर ही प्रसिद्ध कार विकत घेण्याचा प्रस्ताव टाटांनी फोर्डकडे पाठवला. त्यांची डील झाल्यावर फोर्ड म्हणाला, ही कार विकत घेऊन तुम्ही माझ्यावर उपकारच केले.

No comments:
Post a Comment