जीवनात पुढं जाण्यासाठी माणूस प्रयत्न करत असतो आणि या प्रयत्नांवर शंका घेतल्यानं सगळ्या प्रयत्नावर पाणी फिरतं. शंका माणसाचा उत्साह कमी करतं. शंकेमुळे माणूस योग्य वेळ येण्याची वाट पाहात राहतो. त्याला वाटतं की, योग्य संधी आल्यावर आपण काम करू. जी माणसं आपल्या योग्यतेवर शंका घेतात, ती माणसे नेहमी द्विधा मनस्थितीत असतात. काम सुरू करू का नको, असे शंकाकारी प्रश्न त्यांच्या मनात सतत घोळत असतात. ही माणसं सतत काम टाळत असतात. त्यांना नेहमी वाटत राहतं की, अजून योग्य वेळ आली नाही. ते आपली दिशा निश्चित करू शकत नाहीत आणि मग ते इकडे-तिकडे वायफट भटकत राहतात.
शंकेपासून सुटका करून घ्यायची असेल तर मनात विश्वास निर्माण करायला हवा. जे काम सुरू केले आहे, त्यात नक्की यश मिळेल, असा विश्वास त्याच्यात यायला हवा. जर माणसाने तो एका मोठ्या पुरस्कारासाठी काम करत आहे आणि विजय त्याचाच होईल, यश त्यालाच मिळेल, असा विश्वास ठेवल्यास त्याचे प्रयत्न सकारात्मक पडत राहतील. विश्वास एक टॉनिक आहे,तो माणसाच्या सगळ्या यंत्रणांना , शक्तींना सक्रिय करतो. शंका आल्याने माणूस काम करायचं बंद करतो. पण विश्वास असेल तर तो अडचणीतदेखील पुढे चालत राहतो.
आता सगळं तुमच्यावर आहे ,तुम्ही कशाची निवडत करायचं ते! मनात बसलेल्या शंकांना दूर लोटण्यासाठी यशाची मनोकामना आवश्यक आहे. जोपर्यंत शंकेला जागा देत नाही, तोपर्यंत तो तुमच्या आसपासही फिरकत नाही. अशी एक म्हण आहे, 'निश्चय कर की तू योग्य आहेस आणि मग पुढे पुढे जात राहा,पण सगळा दिवस निश्चय करण्यातच घालवू नको.' एकाद्या गोष्टीवर किंवा परिस्थितीवर संशय घेण्यापेक्षा तुम्हाला लगेच निर्णय घ्यावा लागेल,तरच तुमची वेगाने प्रगती होईल. तुम्हाला तुमच्या मनाला समजावून सांगितले पाहिजे आणि निश्चित केले पाहिजे की तुम्हाला कुठे जायचे आहे. शंका घेऊन तुम्ही बसून राहिलात तर जग मात्र पुढे जात राहील. आपल्या मनात बसलेली भीती दूर करून विश्वासाची ताकद ओळखा. बहुतांश लोक शंका या कारणासाठी उपस्थित करतात कारण ,त्यांच्या मनात नकारात्मकता असते. त्यांना वाटतं की ते यशाच्या योग्यतेचे नाहीत. त्यांना थोडी जरी विफलता मिळाली तरी ते हार मानतात. उलट पराभव मिळाला असेलतर आणखी ताकदीने पुढे जायला हवे. शंका बाजूला सारा. तुम्ही पुढे जाऊ शकता, हा विश्वास तुमच्यात निर्माण करा. तुम्ही योग्यतेचे आहात आणि तुम्हालाही यश मिळू शकतं, हा विश्वास मनात बिंबवला पाहिजे.
शेक्सपियरने लिहिलं आहे की, आपली शंका गद्दार आहे. आपण जे यश मिळवू शकतो, ते करू शकत नाही कारण आपण संशयात पडल्याने प्रयत्नच करत नाही. माणसाचा स्वभावच असा असतो की, एकादे काम सुरू करतो,तेव्हा थोडा जरी संशय आला तरी आपण ते काम थांबवतो. आपल्या उत्साहावर पाणी पडते. शंकेपेक्षा माणसाने विश्वासाला अधिक प्राध्यान द्यायला हवे.

No comments:
Post a Comment