Saturday, November 28, 2020

या तीन गोष्टींशिवाय कोणतीही व्यक्ती आपले ध्येय साध्य करू शकत नाही


प्रत्येकाची यशस्वी होण्याची रणनीती वेगळी वेगळी असते. वास्तविक कोणाही व्यक्तीची रणनीती त्याच्या आवडीनिवडींवर अवलंबून असते.या सर्व रणनीतींमध्ये असे काही मुद्दे आहेत, ते त्यांच्या यादीमध्ये समाविष्ट केले पाहिजे. चला,त्या गोष्टी जाणून घेऊया, ज्याशिवाय आपले ध्येय साध्य करणे फार कठीण आहे.

1) आपल्या कामात पारंगत व्हा- आपल्याकडे प्रत्येक क्षेत्राचे थोडेसे ज्ञान असल्यास ते आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. परंतु आपण आपले ध्येय याद्वारे साध्य करू शकत नाही. तुम्हाला एकाद्या क्षेत्रात ध्येय गाठायचे असेल तर त्यात पारंगत असणे फार महत्वाचे आहे.

2) ध्येय निश्चित करा- तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही तरी बनायचं असेल तर पहिल्यांदा तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करायला हवे.तुम्ही तुमच्या ध्येयाबद्दल स्पष्ट नसाल किंवा तुम्ही त्याबाबत द्विधा मनस्थितीत असाल तर लक्ष्य साध्य करण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम करू शकणार नाही.तुमचे लक्ष्य एकाद्या काचेसारखे स्वच्छ,स्पष्ट असायला हवे. जेणेकरून तुम्ही त्यातून आरपार पाहू शकाल.तुम्ही हेदेखील लाखात ठेवा की, हवेत तीर मारल्याने किंवा वारंवार लक्ष्य बदलल्याने तुम्ही तुमच्या यशापासून आणखी दूर होत जाल. महाभारतासारखे आजही यश मिळवण्यासाठी तुम्हाला अर्जुनासारखे लक्ष्यावर डोळा ठेवून निशाणा साधावा लागेल. तरच तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकणार आहात.

3) अपयशापासून शिका कौशल्य- जगात असा कोणताही माणूस नाही जो कधीही अयशस्वी झाला नाही. अशा मार्गाने जेव्हा तुम्ही जीवनात अपयशी ठरता, तेव्हा त्याचा मनापासून स्वीकार करा आणि त्यापासून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. आपल्या प्रयत्नांमध्ये काय उणीव राहिली आहे, हे जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. खरे तर तुम्ही लहान असताना  अडखळता तेव्हाच तुम्ही चालायला शिकता, तसाच यशाचा खरा आनंद प्राप्त होतो, जेव्हा तुम्ही तुमच्या अपयशातून शिकता आणि पुढे जाण्याचा आणि यशाच्या जवळ जाण्याचा विचार करता.


Wednesday, November 18, 2020

नकारात्मकतेपासून दूर राहून आपला आत्मविश्वास वाढवा


आपल्यात कायम आत्मविश्वास असावा लागतो. त्याशिवाय तुम्ही हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास जात नाही. तुम्ही जे काही काम करत असाल, कोणत्याही व्यवसायात किंवा व्यापारात असाल तर, कार्य योग्यरित्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वासाची आवश्यकता आहे.  आत्मविश्वास हा अगदी आपल्या स्नायूंप्रमाणेच असतो.  जितका जास्त आपण स्नायूंचा वापर कराल तितकी त्यांची ताकद अधिक मजबूत होते.  त्याच प्रकारे एकदा का आत्मविश्वासाने कार्य करत राहिलात की आणखी त्यात वाढतच होत जाते.

खरं तर सुरुवातीला आत्मविश्वास मिळवणे  खूप अवघड असते, परंतु एकदा का तो आपल्याकडे आला की आपण कितीही कठीण, अवघड कार्य  असले तरी सहजपणे  पार पाडू शकतो.  हा आत्मविश्वास आत्मसात करण्यासाठी या खालील  उपायांचा तुम्ही अवलंब करू शकता.

आपली कार्ये पूर्ण करा: आपलं काम करत राहिल्याने आत्मविश्वास हळूहळू वाढत जातो आणि या सुरुवातीच्या कार्यापासूनच हळूहळू  कार्य योग्यरित्या पूर्ण करायला वाव मिळतो.  जसजसे,आपण आपली कार्ये योग्य प्रकारे पूर्ण करण्यास प्रारंभ करतो, तसतसे आपल्याला आपोआप मानसिक समाधान मिळत जाते. त्यामुळे आत्मविश्वास वाढीला चालना मिळते.

सकारात्मक लोकांसोबत रहा: जर तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असेल की, जी तुम्हाला नेहमीच कमी लेखते आणि नेहमीच नकारात्मक बोलते, तर अशा व्यक्तीपासून दूर राहा.  जे लोक आपल्याबद्दल सकारात्मक विचार करतात त्यांच्यासोबतच नेहमी रहा.  जर नकारात्मक विचारांची माणसं तशीच कायम वागत राहिली तर  त्यांना तिथेच सोडून तुम्हाला पुढे जाण्याची गरज आहे.  यामुळे तुमचा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढेल.

स्वतःला कमी लेखू नका: बर्‍याचदा आपण स्वतःबद्दल जी धारणा बनवतो, ती आपल्या क्षमतेपेक्षा कमी असते.  असे अजिबात करू नका.  स्वतःला कधीही कमी लेखू नका.  इतर लोक करू शकतात, अशा प्रत्येक गोष्टी तुम्हीही करू शकता.  आपल्यात अनेक क्षमता असतात शिवाय  नसलेल्या बर्‍याच क्षमता  देखील  आपण प्रयत्नाने विकसित करू शकतो.  हा विचार कायम ठेवा,त्यामुळे या विचाराने तुमचा आत्मविश्वासही वाढेल.

धाडसी बना: आपले कार्य करीत असताना नेहमी निर्भय राहा.धाडस अंगी बानगा.  आपण जर चूकच केली नसेल तर घाबरण्याचा प्रश्नच येत नाही. घाबरल्यामुळे आपण बर्‍याच वेळा आपल्या कामात चूक करतो आणि यामुळे आपला आत्मविश्वास ढळतो.  आत्मविश्वास गमावल्यामुळे कामात चुका होण्याचा धोका  आणखी वाढतो. त्यामुळे निर्भयपणे काम करा.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Tuesday, November 10, 2020

यशासाठी विवेक आणि सकारात्मकता आवश्यक


प्रथम आपण आपले ध्येय निश्चित केले पाहिजे आणि मग त्या लक्ष्याच्या दिशेने कार्य करण्यास प्रारंभ करायला पाहिजे.  आपले लक्ष्य आवड, सामर्थ्य आणि प्राधान्य यावर आधारित निश्चित करा. तुम्ही तुम्हाला- स्वतःला विचारा, खरेच हे काम आपण करू शकतो का? आपल्याला या  कामात रस आहे का?  आपले प्राधान्य कशाला आहे?  या गोष्टींची उत्तरे मिळवण्यानंतर निर्णय घ्यायला  सोपे जाईल.

बहुतेक करून लोकांना असा विश्वास असतो की, केवळ चांगले शिक्षण आणि कठोर परिश्रम केल्याने यश मिळू शकते.  हे देखील खरे आहे, परंतु जर आपण थोडा सकारात्मक दृष्टीकोन ठेवला आणि शहाणपणाने वागलात तर आपण नक्कीच एक यशस्वी व्यक्ती होऊ शकता. 

एखादी रणनीती तयार करा: लक्ष्य साध्य करण्यासाठी एखादे धोरण तयार करा.  रणनीती तयार करणे सर्वात महत्वाचे आहे, कारण यावर आधारितच आपल्याला यशाच्या शिखरावर जावे लागेल.  एखादी रणनीती आखताना आपण आपल्या क्षमतेला कमी लेखू नये.

आपला कमकुवत पैलू ओळखा: रणनीती बनवल्यानंतर आपण आपल्या उणीवा दूर करण्याचा प्रयत्न करावा, जे आपल्या यशामध्ये अडथळा ठरू शकतात.  आपल्या उणीवा जाणून घेण्यासाठी आणि वेळेत उणीवा दूर करण्यासाठी मित्र, पालक किंवा शिक्षकांची मदत घ्या.

आपली प्रगती तपासा: रणनीतीनुसार हळूहळू यशाच्या दिशेने जा. आपण ध्येय गाठण्यासाठी तयारी करीत आहात, तीसुद्धा योग्य दिशेने जात आहे का,  याची चौकशी होणे महत्त्वाचे आहे.  जर आपल्याला हे माहित नसेल तर शेवटच्या क्षणांमध्ये आपला वेग कमी होईल.  तर हे टाळण्यासाठी आपली तयारी तपासा किंवा एका विशिष्ट वेळेनंतर वरिष्ठांकडून तपासणी करून घ्या. यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला किती प्रयत्न करावे लागतील हे कळेल.

चुकांपासून शिका: जेव्हा आपण आपले कार्य तपासण्यास प्रारंभ करतो, तेव्हा आपल्यासमोर बर्‍याच चुका येऊ लागतील.  या चुकांकडे कधीही दुर्लक्ष करू नका कारण चुकांकडे दुर्लक्ष करणे ही मोठी चूक आहे.  आपल्याकडून चुका का आणि कोठे होत आहेत, याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या आणि त्या संपूर्ण तयारीसह दूर करा.  जर तुम्ही या दिशेने परिश्रमपूर्वक संपूर्ण प्रामाणिकपणाने प्रयत्न कराल तर यश तुमच्यापासून फार काळ दूर राहू शकत नाही.  सर्वांत पहिल्यांदा तुम्ही मोठ्या चुका दूर केल्या पाहिजेत. कारण त्या दुरुस्त झाल्याशिवाय लहान लहान चुका आपोआप निघून जाणार नाहीत.-मच्छिंद्र ऐनापुरे



Friday, November 6, 2020

ध्येयपूर्ती हिमखंडासारखी


ध्येय म्हणजे नक्की काय, माझे ध्येय काय आहे, हे प्रश्न अधिक महत्त्वाचे. ध्येय ठरवणे, त्यावर काम चालू करणे याबरोबरच ध्येय ठरविण्याआधी काही मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधणे अत्यावश्यक आहे. बऱ्याचदा आपण एखादी ट्रिप प्लॅन करतो, त्यासाठी पूर्वतयारीही करतो. कधी प्लॅन अपेक्षेपेक्षा चांगला अमलात आणला जातो तर कधी कमी. ध्येयाचे गणित मात्र  थोडे वेगळे असते.

आपण एक स्वप्न बघतो; ज्यामध्ये आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होताना दिसू लागतात. आपण स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी एक ध्येय ठरवतो. ध्येयाची दिशा ठरली, की आपण मार्ग शोधण्याची प्रक्रिया चालू करतो. प्रत्येक मार्गामध्ये काही प्रगतिदर्शक किंवा मापदंड ठेवतो. उदाहरणार्थ : एक व्यक्ती जेव्हा व्यवसायात उतरायचे ठरवते तेव्हा काही यशस्वी होण्याचे मापदंड ठरवून वाटचाल चालू होते. हे मापदंड पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या  संसाधनाचा (रिसोर्सेस) विचार येतो. काही आपल्याकडे असतात, काही नसतात. बऱ्याचदा संसाधने नाहीत म्हणून ध्येय बदलले जाते किंवा मधूनच सोडून दिले जाते. बऱ्याच अडचणी दिसताच  ध्येय मध्यातूनच सोडून दिले जाते व एक प्रकारची निराशा येते. यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी तपासणे आवश्यक आहे.

1)ध्येयाचा हेतू -आपण याआधी 'का?' या प्रश्नाचे महत्त्व व त्याचे फायदे जाणून घेतले. आपल्या वागण्यामागील किंवा विचारांमागील हेतूबरोबरच आपल्या ध्येयाचाही हेतू जाणून घेणे गरजेचे. आपण जे ध्येय ठरवले आहे, ते आपण का ठरवले आहे, हा पहिला प्रश्न विचारावा. कोणीतरी ठरवले आहे म्हणून, सगळे ठरवतात म्हणून, का मला खरेच काहीतरी बदलायचे आहे म्हणून? हेतू स्पष्ट झाला, की विचारात स्पष्टता येते.

2) ध्येयासाठी लागणारी मानसिकता-ध्येय ठरवताना नकारात्मक किंवा इतरांना दोष देण्याची मानसिकता असेल, तर ध्येयसुद्धा त्याचप्रमाणे तुम्हाला नकारात्मक परिणाम देते. ध्येयासाठी लागणारी योग्य मानसिकता कोणती व ती माझ्याकडे आहे का, हे तपासावे.

3) स्वतःला बदलण्याची तयारी- ध्येय ठरविल्यानंतर स्वतःमध्ये खूप बदल करावे लागतात. काही लोकांना बदल नको असतो; मग तो विचारांचा असला तरीही. स्वतःमध्ये कोणते बदल घडवायला हवेत व त्याची आपली तयारी आहे का, याची स्पष्टता आधीच घ्यावी.

4)आपल्यातील वचनबद्धता- ध्येय ठरवून धरसोड करणे योग्य नाही. आपण आपल्या ध्येयासाठी किती वचनबद्ध आहोत, हे तपासावे. तसेच, त्या वचनबद्धतेसाठी लागणारी मानसिकता व कष्ट करण्याची तयारी आपली आहे का? जरी आत्ता नसली, तरी ही तयारी आपण करू शकतो का, याची स्पष्टता व्यावी.

5)आपल्यातील संयम व सहनशीलता- आज ध्येय ठरविले म्हणजे उद्या लगेच मनाप्रमाणे होणार, असे नाही. मनाप्रमाणे झाले नाही तर आपण कसे प्रतिसाद (रिअॅक्ट) देतो, याचा विचार करा. आपल्यामध्ये संयम व सहनशीलता आहे का, हे तपासणे गरजेचे आहे.

ध्येयपूर्ती ही हिमखंडासारखी आहे. वरचे टोक सर्वांना दिसते; पण पाण्याखाली असते ती स्व-जागरूकता, स्व. परिवर्तनासाठी घेतलेले निर्णय, कष्ट व स्वतःमध्ये केलेला बदल.या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.


Tuesday, October 27, 2020

विचार बदला-व्यक्तिमत्त्व सुधारेल


१) स्वतःला जाणून घ्या* *{KNOW YOUR SELF}- स्वतःला समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी स्वतःमध्ये काय चांगल्या आणि वाईट गोष्टी आहेत याची एक यादी करा. त्यानंतर त्यातील चांगल्या गोष्टी प्रत्येक आठवड्याला वाढवण्याचा प्रयत्न करा. सोबत वाईट गोष्टींवर मात करीत एक प्रभावी, तजेलदार व्यक्तिमत्त्व घडवा.

२) तुमच्या वागण्या-बोलण्यात सकारात्मकता आणा {BE POSITIVE)- तुमच्या वागण्या- बोलण्यातून सकारात्मक भाव समोरच्या व्यक्तीवर प्रतित व्हायला हवा. तुम्ही नकारात्मक असाल, किंवा काही कारणांनी नाराज असाल तर समोरच्या व्यक्तीवर तुमचा प्रभाव पडणार नाही. तो व्यक्ती तुम्हाला टाळायचा प्रयत्न करेल. अशा वेळी तुम्ही तुमचे मुद्दे त्याला पटवून सांगू शकत नाहीत.

३) तुम्हाला स्वताचे मत असू द्या (HAVE OPINION)- कोणताही प्रसंग असो तुम्हाला मत असणे अत्यंत आवश्यक आहे. मत नसलेल्या व्यक्तिला सध्याच्या स्पर्धात्मक युगात स्थान नाही. एकदा इतरांना समजले, की तुम्हाला मत नाही तर ते तुम्हाला गृहीत धरु लागतात. यात तुमचे नुकसान होते.

४) नवीन लोकांना भेटा (EXPAND YOUR HORIZON)- असे म्हटले जाते, की दररोज तुम्ही एक माणूस जोडला पाहिजे. जर हे शक्य नसेल तर एका आठवड्यात किमान एक माणूस जोडण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा ग्रुप वाढतो. तुम्हाला नवनवीन गोष्टी कळतात, समजतात. तुमच्या ज्ञानात भर पडते.

५) वाचन करा, नवीन छंद जोपासा (READING &HOBBIES)- वाचन करणारा व्यक्ती ज्ञानी समजला जातो. कारण दररोज त्याच्या ज्ञानात भर पडत असते. नवनवीन गोष्टी तो आत्मसात करीत असतो. यामुळे तुमचा समजूतदारपणा अधिक फुलतो. आणखी लोक तुमच्याशी जोडले जातात. तसेच नवीन छंद जोपासायचा प्रयत्न करा. त्यातून तुमचा वेळ सत्कर्मी लागतो.

६) तुम्ही चांगला श्रोता व्हा (BE BEST LISTENER)- समोरचा व्यक्ती काय सांगतोय, हे तुम्ही लक्ष देऊन ऐकायला हवे. जसे तुम्ही चांगला वक्ता असावेत तसेच चांगला श्रोता असणेही महत्वाचे आहे. अन्यथा समोरचे व्यक्ती तुम्हाला ऐकून ऐकून बोर होतात. तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतात.

७) तुम्ही जरा विनोदी राहा (BEST MOOD)- सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रचंड ताणतणाव शिरला आहे. शिवाय चार डोकी भेटली, की कायम गंभीर विषयांवर चर्चा केली जाते. अशा वेळी एखादा विनोद तुम्हाला वेगळे परिमाण देऊन जातो. पण उपस्थित असलेल्या लोकांमध्ये तुम्ही केलेला विनोद किती साजेशसा, समंजस आहे हे आधी तपासून घ्या. नाहीतर हसे करुन घ्याल.

८) इतरांचा आदर राखा-(BEHAVIOUR)- भारतात आदर या शब्दाला प्रचंड महत्त्व आहे. जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला आदर दिला, सन्मान दाखवला तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळी झळाळी झळळते. त्याच्या मनातील तुमचे स्थान अधिक बळकट होते. त्याचा तुम्हाला भविष्यात लाभ होतो.

९) देहबोली वर भर द्या(BODY LANGUAGE)- समोरच्या व्यक्तिशी संवाद साधताना, बोलताना अगदी कंम्फर्टेबल राहा. तुमच्या बॉडिलॅंग्वेजवर भर द्या. त्यातून तुम्ही प्रभावी संभाषण साधू शकता. आपले मुद्दे पटवून देऊ शकता. भाषण करतानाही बॉडी लॅंग्वेजला खूप महत्त्व आहे.

१०) ड्रेसिंग सेन्स सुधारा( PERSONALITY)-एखाद्या इव्हेंटनुसार आपले ड्रेसिंग ठेवा. ऑफिसला जाताना साजेशसे कपडे घाला. रात्रीची पार्टी असेल तर पार्टी लुकमध्ये जरा मॉर्डन दिसण्याचा प्रयत्न करा. कलिग्जसोबत बाहेर फिरायला जाणार असाल तर कॅज्युअल्स घाला.

११) आत्मपरिक्षण करा (INNER VOICE)- आत्मपरिक्षण अत्यंत आवश्यक आहे. त्यातून तुमच्या चांगल्या वाईट बाबी समोर येत असतात. तुम्ही खरंच चुकताय की बरोबर आहात, हे तुम्हाला समजून येते. तुम्ही मार्गक्रमण करीत असलेला मार्ग योग्य की दुसरा मार्ग पकडायला हवा, हेही समजते.

१२) स्वतःवर विश्वास ठेवा {SELF CONFIDENC)- आत्मविश्वास असायलाच हवा. आपल्या गुणांची आपल्याला पारख हवीच. पण ओव्हर कॉन्फिडन्ट राहू नका. त्यात तुमचे नुकसान असते. पण स्वतःला दुर्लक्षितही करु नका. अन्यथा तुमच्यात गट्स असतानाही तुम्ही स्पर्धेच्या बाहेर फेकले जाता. सर्वोत्तम राहण्याची क्षमता असतानाही मागच्या रांगेत उभे राहता. तेव्हा बी कॉन्फिडन्ट. जगावर मात करा.

Thursday, October 22, 2020

अपयश देतो नवा दृष्टिकोन


प्रत्येकाला कधी ना कधी आयुष्यात अपयशाला तोंड द्यावं लागतच. परंतु, काही लोक आपल्या या अपयशाला आपली पूर्ण हार समजून हतबल होऊन जातात. पण काही लोक या अपयशातून धडा घेऊन मार्गक्रमण करीत राहतात आणि यशाच्या शिखरापर्यंत पोहचतात. याचाच अर्थ या अपयशातूनच काही महत्त्वाचा धडा घेऊन आपण आपलं आयुष्य आणखी नेटाने पुढं नेऊ शकतो. जेव्हा आपण अपयशी होतो,तेव्हा त्यातून काहीतरी नवं शिकतो. चुका शोधतो. आणि मग त्यातून शिकतो. अशाच प्रकारे जीवन,प्रेम,धन, नाती, माणसं आणि व्यापार यांच्याबाबतीत आपला  पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. आयुष्यात कशाला महत्त्व द्यायचं आणि कशाला किंवा कुणाला दूर ठेवायचं, याची जाण येते. अपयशामुळे नव्या गोष्टी शिकतो. नव्या योजना बनवतो आणि नवे समझोतेही करतो. प्रत्येक अपयशानंतर आपण आणखी तावून-सुलाखून निघतो. खरं तर ही शिकण्याची नैसर्गिक प्रक्रिया आहे. जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला आता आताच अपयश आलं असेल तर तुम्हाला लगेच त्याचा काही लाभ दिसणार नाही. पण याचे महत्त्व तुम्हाला काही काळ उलटल्यानंतर कळेल.

अपयशामुळे आपल्याला चांगले अनुभव मिळतात- या अपयशामुळे पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा धडा मिळतो तो म्हणजे अनुभव.जेव्हा आपण कुठलेही काम करण्यात अपयशी ठरतो, तेव्हा आपल्याला त्याचा अनुभव मिळतो-त्यामुळे जीवनाचा अर्थ समजून घ्यायला मदत मिळते. खरं सांगायचं तर जो अनुभव तुम्हाला तुमच्या अपयशाने मिळतो, त्याच्या इतके कुठलेच मोल नसते.

अपयशाने वाढतो आत्मविश्वास- जेव्हा आपण अपयश मागे सोडून पुढे यशाच्या दिशेने जात असतो,तेव्हा आपला आत्मविश्वासदेखील वाढत जातो. पुन्हा पुन्हा अशा परिस्थितीचा सामना केल्यानंतर कुठल्याही कठीण परिस्थितीतून बाहेर पडताना आत्मविश्वासही द्विगुणीत होतो.

अपयशाने तुमच्या जीवनाचा प्राधान्यक्रम बदलतो- एक म्हण आहे, अपयश तुम्हाला आयुष्यातून उठवते किंवा आयुष्य बनवते. या गोष्टीचं प्रमाण म्हणजे आज जे सगळे  यशस्वी लोक यशाच्या शिखरावर आहेत, त्यांनी या मार्गावरून जाताना कितीदा तरी अपयशाचे धक्के खाल्ले आहेत. पण ही यशस्वी माणसं या धक्क्यातून सावरली आहेत, उठून उभी राहिली आहेत आणि पुढे चालत राहिली आहेत. यानंतरच ते यशाच्या शिखरावर पोहचले आहेत. आज ती यशाची चव चाखत आहेत. ज्यावेळेला आपण आपल्या कामात अयशस्वी होतो, त्यावेळेला आपण आपल्या जीवनाच्या प्राथमिकतेवर विचार करायला लागतो. कशाला प्राधान्य द्यायचं या गोष्टी विचाराने ठरतात. आणि मग गरजेनुसार आपण त्यात बदल करतो. हे का करतो? कारण लवकरात लवकर आपल्या लक्ष्यापर्यंत पोहचता यावं म्हणून...!-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Tuesday, September 8, 2020

इमॅजिनेशनसोबत हवं नॉलेज


तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर फक्त तुमच्याकडे नॉलेज असून चालणार नाही. यशस्वी होण्यासाठी व्यक्तीजवळ इमॅजिन करण्याची क्षमताही असावी लागते. जर तुमच्याजवळ कल्पनाशीलतेचा (इमॅजिणेशन) अभाव असेल तर फक्त कोऱ्या ज्ञानाच्या जीवावर तुम्ही काहीच मिळवू शकणार नाही. शास्त्रज्ञ आइन्स्टिन कल्पनाशीलतेला ज्ञानापेक्षा अधिक महत्त्वाचे मानत होते. ते प्रायोगिकरित्या काहीही सिद्ध करण्याअगोदर ते पहिल्यांदा कागदावर उतरवून काढत. अशा प्रकारे शास्त्रज्ञ एडिसन यांनी विद्युत बल्ब जगासमोर आणण्यापुर्वी त्याचे कच्चे रेखाटन आपल्या वहीत रेखाटले होते. ते अजिबात 'हवेत गोळ्या मारत' नव्हते. त्यांनी पहिल्यांदा मनातल्या मनात कल्पना केली होती की, विद्युत बल्ब कसा दिसायला हवा. यानंतरच त्यांनी आपल्या कल्पनेला मूर्त स्वरूप द्यायला सुरुवात केली. 

वास्तविक एखादी व्यक्ती यश मिळवण्याच्या दिशेने काम करायला लागते, तेव्हा सगळ्यात अगोदर त्यांचं अंतिम कच्चं चित्र त्याच्या डोक्यात तयार व्हायला हवं. ज्या चांगल्या प्रकारे यशाचं चित्र डोक्यात तयार होईल, तितक्या लवकर तुमच्या यशाला मूर्त स्वरूप प्राप्त होईल. जर तुम्ही आपल्या डोक्यात यश आणि त्याच्या संभावित मार्गाचे चित्र बनवले नसेल तर तुम्ही फक्त भरकटत जाल आणि अंतिमतः तुमच्या हाताला काहीच लागणार नाही. तुम्ही म्हणाल, मन ज्याचा विचार करतं, तसं होणं शक्य नाही. पण हेही खरं आहे की, कित्येकदा आपण आपल्या विचारांच्या मागे जायला लागतो, तसतसे यश मिळायला लागते. यामुळेच जगातले बहुतांश सक्सेस गुरू तुम्हाला 'पॉजिटीव्ह थिंकिंग'चा (सकारात्मक राहण्याचा)  सल्ला देतात. 

पॉजिटीव्ह विचार केल्याने तुम्ही तुमच्या यशाच्या मार्गाचा विचार करता,अडथळ्यांचा नाही. ज्यावेळी तुम्ही मनात यशोशिखरावर पोहचण्याचे प्लानिंग करता ,त्यावेळी त्या दिशेने वाटचाल करणं सोपं जातं. यासाठी तुम्हाला नॉलेजही हवं. तुम्ही तुमच्या नॉलेजसोबत अंतर्मनाच्या प्रेरणेशी जोडले जाता, तेव्हा तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये एक शक्ती असल्याची जाणीव होते आणि तुम्ही तुमच्या यशोशिखराच्या दिशेने वाटचाल करू लागता. या दरम्यान तुम्हाला अनेक अडचणी येतात, पण तुम्ही तुमच्या ज्ञानाच्या आणि कल्पनाशक्तीच्या जोरावर समस्यांची सोडवणूक करता. गोष्ट मग अभ्यासाची असेल किंवा नोकरीची!  अथवा पैसे कमावण्याची! प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मन आणि डोकं या दोघांचंही ऐका आणि  मगच तुम्ही संतुलित निर्णय घ्या. 

डोकं नॉलेजच्या गोष्टी करेल आणि मन इमॅजिनेशनच्या! आता कशाप्रकारे दोन्ही गोष्टी समजून घेऊन योग्य निर्णय घ्यायचा,हे  तुमच्यावर अवलंबून आहे.निर्णय घेताना तुम्हाला पॉझिटिव्ह राहण्याची गरज आहे. जी माणसं या जगात यशस्वी झाली आहेत, ती माणसंही तुमच्यासारखीच सर्वसामान्य होती. पण त्यांनी यशाच्या अगोदरच यशाच्या बाबतीत चिंतन केलं होतं.त्यामुळेच ते यशस्वी झाले.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Wednesday, September 2, 2020

व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर कामाचे मूल्य (Value) आणि शुल्क (Price) यातला फरक ओळखा

 


एका जहाजामध्ये काहीतरी बिघाड होतो. यामुळे जहाज समुद्रात नेणे अशक्य होऊन बसते. जहाजाचे कर्मचारी सगळं जहाज तपासून पाहतात, पण त्यांना दोष काही सापडत नाही. अथक प्रयत्न करूनही जेव्हा त्यांना अपयशच येतं तेव्हा ते जहाज बांधणी मधील तज्ञ व्यक्ती ला बोलावतात. तो इंजिनियर येतो संपूर्ण तपासणी करतो... जहाजाच्या एका पॅनल मधील स्क्रू ढिल्ला झालेला असतो, त्यामुळे संपूर्ण बॉडी मध्ये प्रॉब्लेम तयार झालेला असतो. इंजिनियर तो स्क्रू पुन्हा पक्का बसवतो आणि जहाज पूर्ववत होते. 

जाताजाता तो इंजिनियर त्याचे बिल जहाज कंपनीकडे सुपूर्द देतो आणि निघून जातो. ते बिल असतं दहा हजार रुपयांचे. एक स्क्रू पक्का बसवण्यासाठी दहा हजार रुपये कंपनीला जरा जास्त वाटतात म्हणून ते त्यांच्या एका कर्मचाऱ्याला त्या इंजिनियर कडे बिल दुरुस्त करायला पाठवतात. कर्मचारी जातो आणि इंजिनियर ला एक स्क्रू पक्का बसवण्याचे इतके बिल होऊ शकत नाही, बिल कमी करा असे सांगतो. 

इंजिनियर त्या कर्मचाऱ्याच्या हातात नवीन बिल सोपवतो. त्यात लिहिलेले असते स्क्रू पक्का बसवण्याचे शुल्क रु. १/- आणि कोणता स्क्रू ढिल्ला आहे हे शोधण्याचे मूल्य ९,९९९/-  यावरून तुम्हाला मूल्य आणि शुल्क (किंमत) यातला फरक लक्षात आला असेल अशी अपेक्षा करतो. मी एखाद्याला कन्सल्टिंग करतो तेव्हा त्यासाठी माझी  कन्सल्टिंग आकारतो. त्यावेळी सुद्धा हि समस्या जाणवते. लोकांना वाटत कि दोन तास बोलायचे एवढे शुल्क कशाला. पण ते शुल्क नसते तर मूल्य असते माझ्या ज्ञानाचे, बुद्धीचे आणि वेळेचे. लोकांना समजावून सांगण्याच्या फंद्यात मी पडत नाही, कालांतराने व्यवसायात समस्या जाणवायला लागल्या कि ते पुन्हा माझ्याकडेच येणार असतात. ते ग्राहक म्हणून आपल्या फी ला शुल्क म्हणून पाहत असतात आणि आपण व्यवसायिक म्हणून आपले मूल्य ठरवत असतो. 

असो... तुम्हाला तुमच्या कामाचे मूल्य ओळखता आले पाहिजे. कित्येक ठिकाणी तुम्ही पहिले असेल कि पारंपरिक कला असलेल्या लोकांकडून हाताने बनविलेल्या वस्तू अतिशय कमी किमतीत घेतल्या जातात. त्या उत्पादकांना आपल्याकडून पन्नास रुपयांना घेतलेली कलाकुसर बाहेर मार्केटमधे हजार रुपयांना विकली जाते हे माहीतही नसते. ते मिळेल तेवढे पैसे घेतात याचे कारण त्यांना त्यांच्या कौशल्याचे मूल्य माहित नसते. त्यांना फक्त त्यांच्या कामाची किंमत माहित असते. एखादा कलाकुसरीचा टेबल हजार रुपयांना मिळत असेल तर तोच टेबल एखाद्या मोठ्या ब्रॅण्डच्या नावाखाली लाख रुपयाला सुद्धा विकला जाऊ शकतो. कारण त्या ब्रँड ने आपल्या वस्तूचे मूल्य ठरवलेले असते किंमत नाही. रोल्स रॉयस कार मध्ये सात आठ कोटी खर्च करावेत असं काही नाही पण त्या ब्रँड चे मूल्यच इतके मोठे हे कि ती किंमतही तुम्हाला त्या गाडीसमोर फिकी वाटते. एखादी पेंटिंग  करोडो रुपयांना विकली जाते याचे कारण तिचे मूल्य आहे, किंमत नाही. कामाचे मूल्य मिळणं हि तशी सोपी गोष्ट नाही. यासाठी तुम्हाला स्वतःला सिद्ध करावे लागते, इतरांपेक्षा वरचढ व्हावे लागते, स्वतःचा ब्रँड बनवावा लागतो, इतरांकडे नसेल असे ज्ञान कौशल्य मिळवावे लागते... हे ज्यांच्यासाठी अवघड आहे त्यांना तसंही यश कमीच मिळतं. त्यामुळे यात तडजोड होऊ शकत नाही  

कष्टाची किंमत मिळते, कौशल्याचे मूल्य मिळते. म्हणून कौशल्य आत्मसात करा. ज्या क्षेत्रात असाल त्यातले तज्ञ व्हा. अगदी बूट पॉलीश जरी करत असाल तरी त्यातले कौशल्य आत्मसात करा. लोक पॉलिश साठी दोन नाही दोनशे रुपये सुद्धा देतील. 

 आपल्या कामाचे मूल्य ओळखा, किंमत तर सगळेच करतात. तुम्हाला तुमच्या कामाचा परतावा शुल्क म्हणून नाही तर मूल्य म्हणून ज्यावेळी मिळायला लागतो त्यावेळी तुमची यशाकडे भक्कम वाटचाल सुरु झालेली असते हे लक्षात घ्या. 


Tuesday, September 1, 2020

पहाटेची अमर्याद ताकद


'तुम्ही सकाळी किती वाजता उठता?' हेल एरॉल्ड नावाचं एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, ते एक प्रचंड यशस्वी व्यावसायीक होते, मोठ्या जिद्दीने त्यांनी एका अपघातामुळे आलेल्या शारिरीक विकलांगतेवर मात केली होती. पण २००८ च्या महामंदीत त्यांचा प्रचंड लॉस झाला, अब्जोपती हेल कर्जबाजारी झाला.पण तो हार मानणारा नव्हता, यातून बाहेर कसं पडावं, हे विचारण्यासाठी तो आपल्या एका यशस्वी मित्राकडे गेला, मित्राने त्याला काय सल्ला दिला असेल बरं?

“हेल, तु सकाळी लवकर उठ! बाकी सगळं आपोआप होईल”या चमत्कारिक सल्ल्याने हेल निराश झाला, त्याला काहीतरी आगळेवेगळे उपाय अपेक्षित होते, काही दिवस त्याने कसेबसे ढकलले, पण दिवसेंदिवस निराशा त्याला घेरत होती, मग नाईलाज म्हणुन त्याने सकाळी चार वाजता उठायची सुरुवात केली, आणि हेल सांगतो, त्याचं आयुष्यच बदलुन गेलं!

पहाट आणि सुर्योदय इतके जादुई असतात का?

इतक्या सकाळी उठुन काय करावं? ह्या प्रश्नावर हेल ने एक कोडवर्ड सांगितलाय.

‘SAVERS’- ह्या आयुष्य बदलुन टाकणार्‍या सहा सवयी आहेत.

१) Silence – (ध्यान)- शांत बसुन स्वतःच्या आत डोकावणे, म्हणजे ध्यान!

- स्वतःच्या आतल्या चेतनेला स्पर्श करणे, म्हणजे ध्यान!

- मनाच्या कॉम्पुटरला फॉर्मेट करुन व्हायरस रिमुव्ह करणे म्हणजे ध्यान!

- मन प्रफुल्लीत आणि ताजतवानं करण्यासाठी आवश्यक असते ध्यान!

- माणसाच्या गरजा किती कमी आहेत, आणि सगळ्या चिंता किती व्यर्थ आहेत याची आत्मप्रचिती म्हणजे ध्यान!

- अफाट, अदभुत आणि आनंददायी विश्वशक्तीसोबत स्वतःला जोडून घेणे, आणि स्वतःच्या मन-शरीराचा कणकण प्रफुल्लित करवुन घेण्याची कृती म्हणजे ध्यान! 

२) Affirmations – (सकरात्मक स्वयंसूचना) - अफरमेशन्स म्हणजे स्वसंवाद! - स्वतः स्वतःला सुचना देणं,

- प्रचंड शक्तिशाली असलेल्या अंतर्मनावर आपण निश्चित केलेलं ध्येय कोरणं!

- येत्या पाच वर्षात, येत्या एक वर्षात, पुढच्या एका महिन्यात, पुढच्या एका आठवड्यात, आणि आज दिवस भर मी काय काय करणार आहे, याचं मनातल्या मनात पुन्हा पुन्हा रिव्हीजन करणे म्हणजे स्वयंसूचना!

- स्वयंसुचनांमुळे कल्पना खोल अंतर्मनात झिरपतात, आणि नाटकीयरित्या सत्यातही उतरतात.

- अंतर्मनाची शक्ती प्रचंड असल्यामुळे तिथे रुजलेला प्रत्येक विचार मग तो चांगला असो की वाईट, खराच होतो.

- एखादी गोष्ट हजारो वेळा बोलली तर ती अंतर्मनात प्रक्षेपित होते, मग अशुभ कशाला बोलायचे? 

- वाईट बोलुन विनाशाला आमंत्रण देण्यापेक्षा, ‘या सुखांनो या’!... 

३) Visualize – (चांगल्या कल्पना मनात घोळवणे.)

तीव्र इच्छा पुर्ण झाली आहे, अशी मनातून कल्पना करणं, ती पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करणं आणि मनःपटला वर तिला बारीक सारीक रुपात साकारणं, म्हणजे व्हिज्वलायजेशन!

- कल्पनाशक्ती ही निसर्गाने माणसाला दिलेली सर्वात अनमोल आणि सर्वात प्रभावशाली भेट आहे.

- कल्पनाशक्तीचा योग्य वापर केल्यास साधारण माणसाचं यशस्वी व्यक्तीमध्ये रुपांतर होतं.

- दररोज आपण आपली ध्येयं पूर्ण झाली आहेत, असं मनात घोळवलं पाहीजे.

पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदकांची रास उभी करणारा मायकेल फेल्प्स म्हणतो. ज्यावेळी मला झोप येऊ लागते, तेव्हा मला जे नक्की करायचे आहे, ते मनातल्या मनात बघण्याचा मी प्रयत्न करतो.

- ऑलंपिकविजेती एथलिट लेन बीचले म्हणाली होती, मागचे चार वर्ष मी एकच निकाल डोळ्यापुढे आणत होते, ते म्हणजे, मी हातात विजेतापदक घेऊन उभी आहे, आणि माझ्यावर शॅंपेनचा वर्षाव होत आहे. 

- मायकेस स्मिथ म्हणाला, मी मला हवे असलेल्या स्वप्नाचे रेखाचित्र कागदावर रेखाटतो, स्वप्नांबद्द्ल टिपण लिहतो, आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याला डोळ्यांसमोर उभे करतो.

- प्रसिद्ध उद्योगपती अझीम प्रेमजींना त्यांच्या यशाचे रहस्य विचारले तर ते म्हणाले, “यश दोनदा मिळते, एकदा मनात आणि दुसऱ्यांदा वास्तव जगात!” 

४) Exercise – (व्यायाम) - शरीरातून आळसाला पळवून  लावण्यासाठी, शरीरातील उर्जा वाहती ठेवण्यासाठी, मनाने कणखर आणि आनंदी राहण्यासाठी आवश्यक असतो, व्यायाम! शरीर आळसावलं की मन भ्रष्ट झालंच समजा! व्यायाम, योगासने, प्राणायाम यांच्या माध्यमातून उर्जे*पहाटेची अमर्याद ताकद.

- व्यायाम, योगासने, प्राणायाम यांच्या माध्यमातून उर्जेला वळण न दिल्यास ती अतिरिक्त बाबीकडे वळते, आणि माणूस वासनांचा गुलाम बनतो.

- वाईट सवयींचा गुलाम झालेल्या माणसातले चैतन्य हरपते, अशा व्यक्तीला एकाकी असल्याची जाणीव अस्वस्थ करते.  

- तो कशावरच एकाग्र होवू शकत नाही, आणि म्हणून तो आनंदी होवू शकत नाही, मनात एक अनामिक भय तयार होते.

- ह्या सगळ्या दुष्ट श्रंखलेला तोडण्याचा एकच उपाय, तो म्हणजे, व्यायाम करा, डिप्स मारा, सूर्यनमस्कार घाला, पुलअप्स करा, ट्रेडमिलवर घाम गाळा,प्राणायाम करा.  शरीरातले चैतन्य जिवंत ठेवा.

५) Reading – (वाचन)- पुस्तकं वाचणारी माणसं एका आयुष्यात अनेक आयुष्य जगतात.

- पुढच्याच ठेस, मागचा शहाणा, ह्या न्यायाने दुसर्‍यांच्या अनुभवाने शहाणे होणारे लोक जगावर राज्य करतात.

- वॉरेन बफे, बिल गेटस, मार्क जुकरबर्ग हे सगळे आठवड्याला दोन पुस्तके वाचून पूर्ण करतात.

६) Scribing – (लिहिणे.)

- लिहिल्याने तुमची तुमच्याशी नव्याने भेट होते.

- लिहिल्याने मन रिकामे होते, दुःख नाहीसे होते, मनात नव्या उर्जेचा संचार होतो.

- लिहल्याने नवे रस्ते उघडतात, नव्या प्रगतीच्या वाटा खुलतात.

- संतानी सांगून ठेवले आहे, दिसामाजी काहीतरी लिहीत जावे.

- लिहणं, हे सुद्धा स्वसंवादाचं प्रभावी साधन आहे.लिहिल्याने विचार पक्के होतात.

- सकाळी उठल्यावर आज दिवस भर मी काय करणार आहे, ते लिहावं,

- एखादी समस्या छळत असेल तर ती लिहून त्याचे उपाय लिहावेत.

- मनाला स्वप्नांच्या आकाशात मुक्त पणे पाठवून कागदावर स्वप्ने रेखाटावीत.

- ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी काय काय करणार आहे, त्याचं प्लानिंग, नियोजनही लिहावं,

-  रोज स्वतःला कामे नेमून द्यावीत, आणि पूर्ण झाली की स्वतःला विजयी घोषित करावं.

- लिहिल्यानं मन मोकळं होतं, चिंतांचं ओझं हलकं हलकं होतं!

- जवळच्या व्यक्तीला पत्रं लिहावीत, कधी प्रेरणादायक किस्से कहाण्या लिहाव्यात.

- अशाने अंतरंग फुलुन येतात, उर्जेचा स्रोत खळखळत वाहतो.

ह्या सहा सवयींपैकी प्रत्येक सवय आयुष्य बदलून टाकणारी आहे. वरील सहा सवयींपैकी किती सवयी तुम्ही स्वतःला लावून घेतल्या आहेत.? 

आता आपल्यापैकी प्रत्येकाकडे भरपूर रिकामा वेळ आहे...तो वेळ नकारात्मक पोस्ट वाचून त्यावर चिंतन करण्यात वाया घालवावा की वरील पैकी कोणत्याही एका किंवा जमत असल्यास सर्वच गोष्टी अमलात आणण्यासाठी प्रयत्न करायचा हे सर्वस्वी आपणच ठरवायचे आहे.

कोणतीही गोष्ट अंगवळणी पाडण्यासाठी किमान 21 दिवसांचा सराव आवश्यक असतो...आणि आपल्याकडे आता कदाचित 21 पेक्षा जास्त दिवस रिकामे असणार आहेत.. तेव्हा या वेळेचा सदुपयोग करून भावी जीवनासाठी सशक्त मन आणि सशक्त शरीर बनवू.... अशी वेळ व संधी पुन्हा येणार नाही व ती येऊ ही नये.....

वेळ आहे स्वतःवर काम करण्याची....स्वतःसाठी जगण्याची.....आलेल्या परिस्थिती चा फायदा करून घेण्याचा.. काळजी घ्यायची आहे,काळजी करायची नाही. ला वळण न दिल्यास ती अतिरिक्त बाबीकडे वळते, आणि माणूस वासनांचा गुलाम बनतो.

- वाईट सवयींचा गुलाम झालेल्या माणसातले चैतन्य हरपते, अशा व्यक्तीला एकाकी असल्याची जाणीव अस्वस्थ करते.  

- तो कशावरच एकाग्र होवू शकत नाही, आणि म्हणून तो आनंदी होवू शकत नाही, मनात एक अनामिक भय तयार होते.

- ह्या सगळ्या दुष्ट श्रंखलेला तोडण्याचा एकच उपाय, तो म्हणजे, व्यायाम करा, डिप्स मारा, सूर्यनमस्कार घाला, पुलअप्स करा, ट्रेडमिलवर घाम गाळा,प्राणायाम करा.  शरीरातले चैतन्य जिवंत ठेवा.

५) Reading – (वाचन)

- पुस्तकं वाचणारी माणसं एका आयुष्यात अनेक आयुष्य जगतात.

- पुढच्याच ठेस, मागचा शहाणा, ह्या न्यायाने दुसर्‍यांच्या अनुभवाने शहाणे होणारे लोक जगावर राज्य करतात.

- वॉरेन बफे, बिल गेटस, मार्क जुकरबर्ग हे सगळे आठवड्याला दोन पुस्तके वाचून पूर्ण करतात.

६) Scribing – (लिहिणे.)

- लिहिल्याने तुमची तुमच्याशी नव्याने भेट होते.

- लिहिल्याने मन रिकामे होते, दुःख नाहीसे होते, मनात नव्या उर्जेचा संचार होतो.

- लिहल्याने नवे रस्ते उघडतात, नव्या प्रगतीच्या वाटा खुलतात.

- संतानी सांगून ठेवले आहे, दिसामाजी काहीतरी लिहीत जावे.

- लिहणं, हे सुद्धा स्वसंवादाचं प्रभावी साधन आहे.लिहिल्याने विचार पक्के होतात.

- सकाळी उठल्यावर आज दिवस भर मी काय करणार आहे, ते लिहावं,

- एखादी समस्या छळत असेल तर ती लिहून त्याचे उपाय लिहावेत.

- मनाला स्वप्नांच्या आकाशात मुक्त पणे पाठवून कागदावर स्वप्ने रेखाटावीत.

- ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी काय काय करणार आहे, त्याचं प्लानिंग, नियोजनही लिहावं,

-  रोज स्वतःला कामे नेमून द्यावीत, आणि पूर्ण झाली की स्वतःला विजयी घोषित करावं.

- लिहिल्यानं मन मोकळं होतं, चिंतांचं ओझं हलकं हलकं होतं!

- जवळच्या व्यक्तीला पत्रं लिहावीत, कधी प्रेरणादायक किस्से कहाण्या लिहाव्यात.

- अशाने अंतरंग फुलुन येतात, उर्जेचा स्रोत खळखळत वाहतो.

ह्या सहा सवयींपैकी प्रत्येक सवय आयुष्य बदलून टाकणारी आहे. वरील सहा सवयींपैकी किती सवयी तुम्ही स्वतःला लावून घेतल्या आहेत.? 

आता आपल्यापैकी प्रत्येकाकडे भरपूर रिकामा वेळ आहे...तो वेळ नकारात्मक पोस्ट वाचून त्यावर चिंतन करण्यात वाया घालवावा की वरील पैकी कोणत्याही एका किंवा जमत असल्यास सर्वच गोष्टी अमलात आणण्यासाठी प्रयत्न करायचा हे सर्वस्वी आपणच ठरवायचे आहे.

कोणतीही गोष्ट अंगवळणी पाडण्यासाठी किमान 21 दिवसांचा सराव आवश्यक असतो...आणि आपल्याकडे आता कदाचित 21 पेक्षा जास्त दिवस रिकामे असणार आहेत..

तेव्हा या वेळेचा सदुपयोग करून भावी जीवनासाठी सशक्त मन आणि सशक्त शरीर बनवू....

अशी वेळ व संधी पुन्हा येणार नाही व ती येऊ ही नये.....

वेळ आहे स्वतःवर काम करण्याची....स्वतःसाठी जगण्याची.....आलेल्या परिस्थिती चा फायदा करून घेण्याचा.. काळजी घ्यायची आहे,काळजी करायची नाही.

ऊगाच श्रीमंत झालो....


जॅकी श्रॉफ त्यांच्या आई बाबतीत नेहमीच हळहळ व्यक्त करतात. ते म्हणतात , आम्ही गरीब होतो तेंव्हा चाळीच्या एका खोलीत संपूर्ण कुटुंब सामावून जायचे. रात्री झोपेत कुणाला खोकला लागला तरी ,आई उठायची आणि छातीला बाम लावायची. कालांतराने श्रीमंती आली , मोठं घर घेतले आणि प्रत्येकासाठी वेगवेगळ्या रूम घेतल्या गेल्या.

एका रात्री ,आईला अचानक हृदयवीकाराचा झटका आला , ती तड्फडली अन ओरडली पण मोठ्या घराच्या मोठ्या भींतीने एक वेगळीच भिंत तयार करून ठेवली आणि आमची आई नजरे आड झाली. कधी कधी वाटतं, उगाच झालो श्रीमंत आणि ह्याच श्रीमंती मुळे आई गेली. मित्रांनो अन मैत्रिणींनो , आपल्या माणसाच्या म्हणजेच त्यातल्या त्यात उतार वयातील आपल्या आई -वडिलांसोबत रहा. *लहानपणी तुमची पाळण्यात नुसती हालचाल झाली तरी उठून बसणाऱ्या पालकांना जेंव्हा तुमची गरज असेल तेंव्हा तुम्ही नसाल तर त्याहून मोठे दुर्भाग्य कुठले नसेल. त्यांनी तुमच्यासाठी जेवढे केले आहे , त्याच्या १०% जरी तुम्ही केले तरी खुप आहे पण त्यांची साथ सोडू नका....*

(जॅकी श्रॉफ यांचे मनोगत.)

डिडरोट इफेक्ट


तुमच्या माहितीतील असा एखादा सिद्धांत (थेअरी) सांगू शकता का जो किंवा ज्याचे परिणाम खूप भयानक होते / आहेत? ही १७६५ सालची गोष्ट. डेनिस डिडरोट आतापर्यंत ५२ वर्षाचा झाला होता. त्याने खूप जास्त पुस्तके वाचलेली होती आणि जणू त्याची लायब्ररीच त्याच्याकडे होती. तरी त्याने त्याचे पूर्ण आयुष्य गरिबीत काढलेले होते. त्याच्या मुलीच्या लग्नासाठीसुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते.

एकेदिवशी रशियाची त्यावेळेची राणी कँथरीनला डिडरोटच्या ह्या गरिबीबद्दल माहित झाले. तिने डिडरोटला त्याच्याकडील लायब्ररी विकत घेण्यासाठी 1000 GBP, म्हणजेच ५० हजार डॉलर्स किंवा आताचे जवळपास साडेतीन करोड रुपये डिडरोटला देऊ केले. आणि डेनिस डिडरोट एका दिवसांत खूप श्रीमंत झाला. त्याने लगेच त्या पैशातून "स्कार्लेट रॉब" म्हणजे एक उच्च्प्रतीचा सदरा विकत घेतला जो अतिशय महागडा होता. हा सदरा वापरत असतांना त्याला अचानक जाणवले की आपण घालतोय अतिशय उच्चप्रतीचा सदरा आणि आपल्या घरात त्याच उच्चप्रतीच्या वस्तू नाहीत. मग त्याने हळूहळू घरातल्या वस्तू बदलल्या, किचन रूममधल्या वस्तू बदलल्या, फर्निचर बदलले आणि अशा सगळ्या नवीन वस्तू विकत घेतल्या ज्यामुळे आता पूर्ण घर आणि सदरा एकमेकांना शोभून दिसत होते.
परंतु हे सगळे करण्यामध्ये तो पूर्णतः कंगाल झाला आणि त्याच्या नावावर असलेले कर्ज जास्तच वाढून गेले. त्याने हे सगळे दुखः कष्टाने सहन केले आणि हे सगळे आपल्या एका निबंधांत नमूद करून ठेवले. ह्याला मानसशास्त्रात "डिडरोट इफेक्ट (Diderot Effect)" म्हणतात. मोठ्या कंपन्या, विक्रेते, डेव्हलपर्स ह्या इफेक्टचा वापर छुप्या पद्धतीने करतात.
तुम्ही ३०००० हजाराचा मोबाईल घेणार. मग तुम्हाला काहीतरी कमी वाटेल मग तुम्ही अजून ५०० रुपयाचा गोरील्ला ग्लास लावणार. ५००-६०० रुपायचे महिन्याला कव्हर बदलणार. जिथे ५०० रुपयाचा हेडफोन कामी आला असता तिथे ३००० चा हेडफोन घेणार कारण तो मोबाईलला जास्त शोभून दिसेल. एखादा निळ्या रंगाचा मस्त शर्ट घेतला की त्याला मेचींग असलेले घड्याळ, किंवा पँट घेणार. घरी मस्त मोठा टिव्ही आणला की चांगला टेबल आणणार, त्याला टाटा स्काय लावणार, HD वाहिन्या सुरु करणार. रंग चांगला लावला की खिडकीला परदे लावणार, सजावट करणार.
डिडरोट इफेक्ट एका वाक्यात थोडक्यात सांगायचा झाला म्हणजे : "एक नवीन वस्तू विकत घेतली असता तिच्यामुळे दुसऱ्या वस्तूंचा दर्जा आपोआप कमी होतो आणि तो वाढविण्यासाठी आपल्या हातून नकळतपणे जास्त खर्च होतो."
तुम्हीच पहा, सगळे विक्रेते छुप्या पद्धतीने डिडरोट इफेक्टचा वापर करतात. एक साधा चहा वाला तुम्हाला चहासोबत सिगारेट देऊ का विचारतो? SIM विकणारा ३ किंवा ४ महिन्याचे packs टाकून द्यायचे म्हणतो, एक laptop विकत घेतांना त्यासोबत २-३ हजाराचा antivirus टाकून मिळतो. लिंबू, आद्रक, टमाटे घेतल्यावर तुम्हाला म्हटले जाते "आहे मिरची पण घ्या की!!". भांडे घेतल्यावर त्याच्यावर ५० रुपयात नाव कोरून मिळते, झाडं विकत घेतली की १०० रुपयाला त्याच खत मिळते. अशी असंख्य उदाहरणे आहेत.
आपण घेतो एक वस्तू आणि दुसऱ्या वस्तू आपोआप घ्यावेसे वाटतात भले त्यांची गरज आपल्याला नको. आणि अशा पद्धतीने आपण एक वस्तू घेऊन अनेक अनावश्यक किंवा फारसे महत्वाच्या नसणाऱ्या वस्तू त्या पण गरज नसतांना घेऊन टाकतो. आणि आपल्याला कळतसुद्धा नाही. ह्याला "spiraling consumption" म्हणतात म्हणजे एकामुळे दुसऱ्या अनेक गोष्टी गरजेचे वाटणे आणी विकत घेतल्या जाणे.
लक्षात ठेवा, हा "डिडरोट इफेक्ट (Diderot Effect)"!! ही मानवी मनाची वागणूक आहे, ह्युमन टेन्नडन्सी!! आणि ह्याला थांबवले जाऊ शकते. ह्याचे परिणाम भयानक आहेत का?? मी सांगेल जास्त भयानक आहेत. कारण परिणाम उघड्या डोळ्यांनी नाही दिसत. आपण नकळतपणे अनावश्यक खर्च करतच जातो आणि खूप उशिरा लक्षात येत हे सगळे. माणसाला खर्च करण्याची भीती वाटत नाही. त्रास होतो तो हिशोब न लागण्याचा!! - व.पु.काळे
तुम्हीच स्वतःला प्रश्न विचारायचा. "मला ह्या वस्तूची खरच गरज आहे का?" उत्तर हो आले तर आहे त्या किमतीत न घेता रिसनेबल किमतीत वस्तू शोधावी.
वस्तूंची उपयोगिता किती त्यानुसार त्यांना विकत घ्यायचे, ना की स्वतःचे ते किती स्टेटस वाढवतील त्यामुळे. समोरच्याने दुसरी वस्तू दाखवली तरी भान विसरायचे नाही. लक्षात ठेवायचे की, "वस्तू मस्त, भारी वाटली तरी तिचा तुमच्या आनंदाशी आणि उपयोगितेशी काडीचा संबंध नाही." आनंद वाटत असला तरी तो क्षणिक असतो. कालांतराने आनंद जातो आणि पैसेसुद्धा!!
"डिडरोट इफेक्ट (Diderot Effect)"!!
माहिती संदर्भ :
Understanding the Diderot Effect (and How To Overcome It) (Source - Quara)

Monday, August 31, 2020

'ययाति': वि. स.खांडेकर


'ययाति' ही वि. स. खांडेकर लिखित प्रसिद्ध कादंबरी मनुष्याच्या चिरतरुण राहण्याच्या व भोगवादी प्रवृत्तीवर एक वेगळा प्रकाश टाकते. जेव्हा मनुष्याला हा वर मिळतो त्या वेळेस त्याला हे जीवनातील अंतिम तथ्य नव्हे ह्याची जाणीव होते. इ.स. १९७२ साली वि.स. खांडेकरांना ययाति कादंबरीसाठी भारतातील साहित्यासाठीच्या सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.मराठीतला अत्यंत अमुल्य ठेवा. प्रेम म्हणजे नक्की काय हे याचे नितांत सुंदर वर्णन आहे. शर्मिष्ठेचे निष्पाप प्रेम अप्रतिम आहे. मानवाच्या मनातील भौतिक सुखांच्या ओढीचे प्रतिक म्हणजेच ययाती. ययाती, देवयानी, शर्मिष्ठा ह्यांन च मनोगत वाचतांना आपण खरच गुंग होऊन जातो , त्या पात्रात हरवून जातो.

ययातीतीची काही सुंदर वाक्य आहेत ते येथे देत आहे.


● या जगात जन्माला येण्याचा एकच मार्ग आहे, तसं मरणाचं नाही...

मृत्यु अनेक वाटांनी येतो! कुठून ही येतो तो!

●आत्मप्रेम... या जगात जो तो आपापल्याकारिता जगतो हेच खरे. 

वृक्षवेलीची मूळे जशी जवळच्या ओलाव्याकडे वळतात तशी माणसेही सुखासाठी निकटच्या लोकांचा आधार शोधतात.....

●याला जग कधी प्रेम म्हणते, कधी प्रिती म्हणते, तर कधी मैत्री........पण खरोखरच हे आत्मप्रेम असते....

आयुष्याच्या आरंभी ज्यात काही अर्थ नाही असे वाटते त्यातच खोल अर्थ भरलेला आहे,

असे आयुष्याच्या शेवटी आढळून येते.........

●अपहार...

ते फूल पाहून माझ्या डोळयांना जे सुख होईल ते सुख प्रत्येक दिवशी मी घेणार आहे. 

ते फार चांगलं उमललं म्हणजे वेलीजवळ जाउन त्याचा वासही घेणार आहे मी. 

पण ते तोडणार मात्र नाही. आज वासासाठी एक फूल खुडलं तर उद्या तेवढ्याच सुखासाठी फूलामागून फूलं खुडाविशी वाटतील मला. 

मग दूस-यांच्या फूलांचा अपहार करण्याची इच्छा माझ्या मनात प्रबळ होईल........

अपहारासारखा अधर्म नाही..........

●सत्य...

लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे. सत्याचा नाही. सत्य हे नग्न असते. 

नुकत्याच जन्मलेल्या बालाकाप्रमाने असते ते ! ते तसे असावेच लागते..........

●सुख...

या जगात सुख लूटण्याचा काळ एकच असतो-----ते मिळत असते तेव्हा.......!

●प्रिती...

प्रिती ही कधी उमलणा-या फूलासारखी हसते तर कधी उफाळणा-या ज्व़ाळेसारखी दिसते. 

ती कधी चांदणी होते, तर कधी वीज होते. ती कधी हरिणीचे रूप घेते, तर कधी नागीणीचे... ती कधी जीव देते, तर कधी जीव घेते.........!!

●जीवन...

जीवन नेहमीच अपूर्ण असतं. नी असं ते असण्यातच त्याची गोडी साठवलेली आहे..

●प्रेम..

प्रेम माणसाला स्वत:च्या पलीकडे पाहायची शक्ती देतं. ते प्रेम कुणावरही असो, 

ते कशावरही जड़लेलं असो. मात्र ते खरंखुरं प्रेम असायला हवं! ते स्वार्थी, लोभी, किंवा फसवं असता कामा नये. 

●खरं प्रेम नेहमीच नि:स्वार्थी असतं, निरपेक्ष असतं... मग ते फूलावरलं असो, प्राण्यावरलं असो, सृष्टिसौंदर्यावरलं असो, आई-बापावरलं असो, 

प्रियकर-प्रेयसी यांच्यावरलं असो, कुल, शांति, राष्ट्र यांच्यापैकी कुणावरलंही असो. नि:स्वार्थी, निरपेक्ष, 

निरहंकारी प्रेम हीच माणसाच्या आत्म्याच्या विकासाची पहिली पायरी असते...........

असलं प्रेम केवळ मनुष्य करू शकतो! 

● जग माणसाच्या दयेवर चालत नाही.

● ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालतं. 

माणुस केवळ प्रेमावर जगुच शकत नाही.तो इतरांचा परभव करुन जगतो.

● मनुष्य या जगात जी धडपड करतो ती भोगासाठी ! ! 

त्यागाची पुराणं देवळातच ठीक असतात; पण जीवन हे देवालय नाही,ते रणांगन आहे.

● मुद्र शिंपल्यात घालून कधी कुणाला दाखविता येईल का ? 

● फुलाचे चित्र काढून कधी त्याचा सुगंध घेता येईल का ?  प्रीतीची अनुभूती सुद्धा अशीच आहे.

● दैव हे मोठ क्रूर मांजर आहे माणसाला मारण्यापूर्वी त्याला उंदरासारखे खेळविण्यात त्याला विलक्षण आनंद होत असतो.

● लज्जा सौंदर्याचा अलंकार आहे. सत्याचा नाही, सत्य हे नग्न असतं.

● माणसांन उपभोग घेऊ नये अशी जर देवाची इच्छा असती, तर त्यानं शरीर दिलच नसतं, पण केवळ उपभोग म्हणजे जीवन नव्हे.

★ खांडेकर यांना ययाती आणि त्यांच्या रूपक कथेच्या पलीकडे पाहिलं पाहिजे.वि.स खांडेकर हे खरोखरच एक मराठीचे महान लेखक होते म्हणूनच त्यांच्या साहित्याला प्रदेश आणि प्रांत आणि भाषेची सिमा बंधन नव्हत ते साहित्य भारतात, परदेशात ही वाचलं गेलं.

म्हणून त्यांचं साहित्य केवळ मराठीत वाचलं जात नाही, तर समग्र भारतीय भाषांत त्याची भाषांतरे आढळतात. सिंधी, पंजाबी, बंगाली, कन्नड, मल्याळम्, तामिळ, गुजराती, हिंदी, इंग्रजी किती भाषा सांगाव्या, त्यांचं साहित्य भारतभर वाचलं जातं. अभ्यासल जात विशेष म्हणजे, त्या भाषेतही भाषांतरांच्या आवृत्त्या आजही प्रकाशित होतात. तामिळ, गुजरातीत तर खांडेकर यांच्या भाषेतील लेखक मानले जातात. तामिळ व मराठी वाचकांचा कौल घेतला तर तामिळ भाषिक मतं खांडेकरांना अधिक मिळतील.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराय यांना खांडेकरांच्या कादंबऱ्याचें उतारेच्या उतारे पाठ होते. त्यांच्या ‘द्रविड कळघम’, ‘द्रविड मुनेत्र कळघम’ पक्षाची चळवळ खांडेकर विचारांवर उभी राहिली आहे. तामिळ साहित्य इतिहासात ‘खांडेकर साहित्य’ अध्याय म्हणून अभ्यासलं जातं. खांडेकरांचे तामिळ अनुवादक कां. श्री. श्रीनिवासाचार्य तर तामिळमध्ये लेखक म्हणून ओळखले जातात, ते केवळ खांडेकरांच्या भाषांतरामुळे.  श्रीलंका, मलेशिया, रशियामध्ये खांडेकर साहित्यावर संशोधन, समीक्षा आहे. रशियात ‘ययाति’ भाषांतरित झाली आहे. देश, प्रदेशाच्या सीमा ओलांडणारं खांडेकरी साहित्य खरोखर अजरामर आहे. पिढ्या घडविण्याचे कार्य करणा-या मोजक्या साहित्यिकांत वि. स. खांडेकरांचा समावेश होतो, तो या योगदानामुळे. त्यांनी आपल्या साहित्यातून रामायण, महाभारत, पंचतंत्र, पुराण इत्यादींमधील मिथकांचा द्रष्टा उपयोग करून घेतला. इतकेच नाही, तर त्याचा समकालीन परिस्थितीशी समन्वय लावून त्याचा नवा अर्थ सांगितला. 'ययाति' कादंबरी हे त्याचे बोलके उदाहरण होय.

Thursday, August 20, 2020

सात किंमती रत्न

या जीवनात जगत असताना सात रत्ने आपल्याजवळ बाळगल्यास तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. कशाचं दुःख वाटणार नाही. त्यामुळे या रत्नांना जवळ बाळगा. यातले पहिले  रत्न आहे माफी. तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलले, तरी ते मनाला लावून न घेता, मोठ्या मनाने 'माफ' करा.

दुसरे  रत्न  आहे विसरा. दुसऱ्यावर केलेले उपकार विसरा. फळाची अपेक्षा करु नका. 'निःस्वार्थ' भावना ठेवा. तिसरे  रत्न-विश्वास. नेहमी 'स्वकष्ट' आणि 'ईश्वरावर' अतूट विश्वास ठेवा. हीच तुमच्या यशाची पावती असेल.

चौथे  रत्न आहे नातं. समोरच्याच्या मनाची काळजी आपण आपल्या मनापेक्षा जास्त घेतल्यावर जे निर्माण होत ते नातं नात्याला जपा, नात्यांना तडा जावू देवू नका. पाचवे रत्न म्हणजे दान. नेहमी सढळ हाताने दान करा, दान केल्याने धन कमी होत नाही उलट दान केल्याने मिळतो मान आपले मनच आपल्याला दानशूर ही पदवी बहाल करतं

सहावे  रत्न  आहे आरोग्य. दररोज व्यायाम करा, योगासने करा, झुंबा करा, चालणे ठेवा आणि आपले जीवन निरोगी ठेवा. आणि  सातवे रत्न  आहे वैराग्य. नेहमी लक्षात ठेवा की, 'जन्म' आणि 'मरण' कधीच कुणालाच चुकलेले नाही. 'जन्म' घेतला म्हणजे 'मृत्यु' अटळ आहे. वर्तमानात जगा. कोणत्याही गोष्टींचे दुःख कुरवाळित  बसू  नका. 'जीवन' खूप सुंदर आहे, आनंदाने जगा..

माणूस जसा बदलत चालला आहे,तसा निसर्ग देखील बदलत चालला आहे. निसर्गाची ताकद  आहे बघा निसर्गातील एक विषाणू सांगून गेला, पैसा, संपत्ती, गाडी,बंगला,सोने, श्रीमंती याहीपेक्षा आपला जीव महत्त्वाचा आहे.

Tuesday, August 18, 2020

नैराश्य आलं असेल तर हे वाचा

अहमदनगर येथील एक समुपदेशक आहेत अनिल उदावंत. त्यांचा एक किस्सा व्हॉटस अप वर वाचला होता. हा किस्सा वाचला की, नक्कीच तुमचे विचार बदलतील. नैराश्य, डिप्रेशन कमी होईल. 'प्रचंड निराशेनं ग्रासल्यावर म्हणजे डिप्रेशनमध्ये गेल्यावर ५३ वर्ष वयाच्या रमेशने एका समुपदेशकाची भेट घ्यायचं ठरवलं. त्यानं शहरातील एका नामांकित समुपदेशकांना फोन करुन त्यांची अपॉईन्टमेन्ट घेतली. ठरलेल्या दिवशी दिलेल्या वेळेतच रमेश समुपदेशकांकडे पोहोचला. समुपदेशकांना भेटून त्यानं आपली बेहाल अवस्था वर्णन केली आणि "मी सध्या प्रचंड निराशेनं ग्रासलो आहे, त्रासलो आहे" असं स्पष्टच सांगीतलं.

रमेशचं बोलणं समुपदेशकांनी लक्षपूर्वक ऐकून घेतलं होतं.  

समुपदेशकांचे आपल्या विशिष्ठ शैलीतले समुपदेशन सुरु झाले. त्यांनी सर्वप्रथम रमेशच्या सोबत आलेल्या त्याच्या पत्नीला बाहेर बसायला सांगीतले. आता त्या केबिनमध्ये समुपदेशक आणि रमेश असे दोघेच बसले होते. समुपदेशकांनी दोन-चार हलकेफुलके प्रश्न विचारुन रमेशचा ताण हलका करण्याचा प्रयत्न केला. मात्र उत्तरादाखल रमेशची रडकथा सुरु झाली. 

रमेश सांगत होता - " मी खूप त्रासलो आहे चिंतेनं माझ्या काळजावर प्रचंड दाब आला आहे नोकरीतल्या कामाचं टेन्शन, मुलांच्या शिक्षणाची काळजी, त्यांना चांगली नोकरी मिळेल की नाही याची चिंता, बायकोची हौस मौज, घरासाठी घेतलेलं कर्ज, गाडीचे हप्ते, माझं आजारपण, पाहुण्यांची वर्दळ... "

रमेश पुढं बोलतच होता - "या सगळ्या काळज्यांमुळे मी सैरभैर झालोय. कशातच मन लागत नाही. लोकांना वाटतंय माझं छान टुमटुमीत चाललंय. पण माझं मलाच माहित.. मी हे सगळं कसं करतोय ते. रात्री नीट झोप लागत नाही. जेवायला बसलो की अन्नावरची वासना उडून जाते. का कुणास ठाऊक, पण माझं काही खरं नाहीं. मी प्रचंड निराश झालोय!" असं सांगत रमेशनं आपलं सारं दुखणं नि:संकोचपणे मांडलं होतं.

रमेशचं बोलणं लक्षपूर्वक ऐकतानाच समुपदेशकाच्या डोक्यात विचारचक्र सुरु होतं.

रमेशचं बोलणं थांबल्यावर समुपदेशकांनी रमेशला विचारलं- 

"तुमचं प्राथमिक शिक्षण कोणत्या शाळेत झालं?"

रमेशनं त्याच्या प्राथमिक शाळेचं नाव सांगीतलं. रमेशला हा प्रश्न अप्रस्तुत वाटल्यानं त्याचा चेहरा त्रासिक झाला होता. समुपदेशकांनी मात्र त्याच्या त्रासिक चेहऱ्याकडे दुर्लक्ष करुन हलकेच हसत म्हटलं- 

"तुम्हाला त्या शाळेत एकदा जावं लागेल. जमेल का तुम्हाला त्या शाळेत जायला?" 

रमेश हे ऐकून आणखी त्रासला होता. परंतु तरीही तो म्हणाला-

"मला त्या शाळेत जायला जमेल, पण त्यानं माझा प्रश्न सुटणार आहे का? कशासाठी जायचं मी त्या शाळेत?"

समुपदेशक म्हणाले- "त्या शाळेत तुम्ही चौथीच्या वर्गात शिकत असताना तुमच्या वर्गात कोण कोण विद्यार्थी होते, त्यांची सर्वांची नावं तिथल्या एका रजिस्टरमध्ये लिहीलेली असतील. त्या रजिस्टरची एक झेरॉक्स कॉपी हवी आहे. पुढच्या वेळी माझ्याकडे येताना ती तुम्ही सोबत घेवून यायची आहे."

रमेशला या त्रासिक वाटणाऱ्या गोष्टीचीही थोडी गंमत वाटली आणि त्यानं शाळेतून अशी यादी आणायला होकार दिला.

रमेशने समुपदेशकांनी सांगीतल्याप्रमाणे त्यांच्या शाळेत जाऊन चौथीच्या वर्गाच्या रजिस्टरमधील सर्व विद्यार्थ्यांच्या नावांची यादी आणून समुपदेशकांकडे सुपूर्द केली. 

यादीवरुन नजर फिरवित समुपदेशक रमेशला म्हणाले- "हे सर्व जण तुमच्या सोबत शिकत होते. आता तुम्ही एकेक करुन सर्वांना भेटा, त्यांचं सध्या काय चाललंय याची माहिती मिळवा. ही तुम्हाला मिळालेली माहिती एका स्वतंत्र वहीमध्ये लिहा आणि  एक महिन्याच्या आत ती वही मला दाखवायला घेवून या."

रमेशने यादी परत हातात घेतली. त्यात सुमारे १५० नावे होती. या सर्वांना भेटण्यासाठी रमेशने रात्रीचा दिवस केला. खूप फिरुन सुद्धा रमेशला त्यातील फक्त १२० जणांची भेट घेणं शक्य झाली होती. 

महिन्याभराने या भेटीतून मिळालेल्या माहितीचा सर्व तपशील घेवून रमेश समुपदेशकांकडे गेला. सोबतची वही समुपदेशकांच्या हाती दिली. समुपदेशकांनी वहीतील माहिती वरुन नजर फिरवली. त्यांचा हेतू साध्य झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता!

समुपदेशकांनी ती वही पुन्हा रमेशच्या हाती सोपवत त्या माहितीचे मोठ्या आवाजात वाचन करायला सांगीतले. 

रमेशने त्या वहीतील माहितीचे वाचन केले. १२० जणांना भेटून रमेशने मिळविलेल्या माहितीचा साधारण तपशील खालीलप्रमाणे होता -

१) १९ जणांचा मृत्यू झालेला होता.

२) ७ मुली विधवा झालेल्या होत्या.

३) १३ जण घटस्फोटीत होते.

४) १५ मुले दारुच्या व्यसनात पूर्ण अडकली होती.

५) ५ मुले विधूर झाली होती.

६) ४ जणांना मुल-बाळ झालेलं नसल्यानं त्यांच्या दवाखान्याच्या / बाबा -बुवांच्याकडे चकरा सुरु होत्या.

७) २३ जणांना मधुमेहाचा आजार जडला होता.

८) ६ जणांना वेगवेगळ्या कॅन्सरने पछाडले होते.

९) ९ जणांच्या मुलाबाळांचं शिक्षण अर्ध्यातच सुटलं होतं.

१०) ४ जणांना काहीतरी अपघात होऊन अपंगत्व आलेलं होतं.

११) २ जण असे होते की ज्यांना त्यांची मुलं सांभाळीत नाहीत. ते निराधार झाले आहेत.

१२) १ जणाची मानसिक स्थिती बिघडून त्याला वेड लागले होते.

१३) ३ जण इतके गरिब होते की त्यांना रोजच्या खाण्यापिण्याचीही भ्रांत होती.

१४) ५ जण खूप श्रीमंत आणि त्यामूळेच खूप गर्विष्ठ झाले होते.

१६) १ जण आर्थिकदृष्टया सक्षम नसल्याने त्याचे अद्यापही लग्न झाले नव्हते.

१७) १ जण असा होता की ज्याची तीन लग्ने होऊनही तो समाधानी नव्हता.

१८) २ जणांना वेगवेगळ्या गुन्ह्यात तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. ते जेलमध्येच होते.

ही माहिती मोठया आवाजात वाचून पूर्ण झाल्यावर रमेशने समुपदेशकांकडे नजर टाकली. हलकेच स्मित करीत समुपदेशकांनी रमेशला विचारले- " आता सध्या तुमची निराशा काय म्हणतेय?"

समुपदेशकांच्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं? यासाठी रमेश स्वतःशी विचार करु लागला-

"मी नको त्या गोष्टींचा नको तितका बाऊ करतोय. त्यामुळेच आपल्याला नैराश्याने ग्रासलं आहे. खरंतर माझी परिस्थिती इतर सगळ्यांच्या तुलनेत खूप चांगली आहे. माझ्या हाती चांगल्या पगाराची नोकरी आहे. मी आरोग्याच्या दृष्टीनं अगदी ठणठणीत आहे. माझे सारे कुटूंबिय आनंदी आहेत. माझी मुलं हुषार आहेत. त्यांना शिक्षणात आणि अभ्यासातही चांगली रुचि आहे. मी इतरांपेक्षा नक्कीच सुखी आहे."

आपण आजवर चुकीच्या पध्दतीने विचार करुन, चूकीचे वागून आपल्याच सुखाचा चोळामोळा केला आहे! हे लक्षात आल्यानं रमेश खजील झाला होता!

तुम्हालाही असं नैराश्य आलं आहे का? तुम्हाला डिप्रेशन आलंय का?

जर तुम्हालाही निराशाग्रस्त वाटत असेल, तुम्ही डिप्रेस्ड झाला असाल तर तुम्हीही एकदा तुमच्या शाळेत जाऊन यायला हवं. रमेशनं केलेला प्रयोग एकदा तुम्हीही करुन पहायला हवा.'


Thursday, August 13, 2020

वयाच्या 45/ 55 / 65 नंतरचा काळ आनंदात घालवायचा असेल तर...

वयाच्या 45 नंतरचा काळ आनंदात घालवायचा असेल तर काही गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. यासाठी 12 नियम तयार केले आहेत. हे नियम तयार करत असताना अनेक मंडळींची मदत झाली आहे. यातील काही नियम आपल्याला ठाऊक असतील. काही नवीन असतील. तर काही नियम कशाला महत्व द्यावे हे सांगणारे असतील. हे नियम सगळ्यांनीच नीट वाचावेत, लक्षात ठेवावेत व आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. 

1) तुम्ही आत्तापर्यंत कष्ट, मेहेनत व काटकसर करून जे काही पैसे वाचवले आहेत किंवा गाठी मारले आहेत त्याचा उपभोग घेण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. है पैसे मुलाबाळांसाठी, नातवंडांसाठी मागे ठेवण्याएवढा दुसरा मोठा धोका नाही. कारण यांना तुम्ही हा पैसा गोळा करण्यासाठी किती कष्ट घेतले आहेत याची काहीच किंमत किंवा जाणीव नसते.

(धोक्याची सूचनाः- ही वेळ कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीसाठी पण योग्य नाही. मग गुंतवणूकीची योजना कितीही भव्य- दिव्य, आकर्षक किंवा ‘फुल फ्रूफ’ असो. त्यामूळे कदाचीत तुमच्या समस्या व टेन्शन्स वाढायची शक्यता आहे. तुम्हाला टेन्शन विरहीत व शांतपणे आयुष्य जगायचे आहे हे विसरू नका. त्यामूळे या वयात गुंतवणुक करू नये.)

2)  तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या किंवा नातवंडांच्या आर्थिक परिस्थितीची अजीबात चिंता करू नका. तुमचे पैसे स्वतःसाठी खर्च करायला मुळीच कमीपणा मानू नका. तुम्ही तुमच्या मुलाबाळांना इतकी वर्षे संभाळले, त्यांना अन्न-वस्त्र-निवारा दिलात. चांगले शिक्षण दिलेत. आता त्यांना लागणारे पैसे त्यांना कमवू द्यात.

3) आपले आरोग्य चांगले कसे राहील याची काळजी घेत चला. यासाठी झेपेल एवढाच व्यायाम नियमीतपणे करा. उगीचच्या उगीच जिमला जाणे, तासंतास पळणे, तासंतास योगासने करणे किंवा प्राणायाम करणे यासाखे अघोरी व्यायाम करू नका. चांगले खा, भरपूर झोप काढा. नियमीतपणे वैद्यकीय तपासणी करून घेत चला व आपल्या डॉक्टरच्या संपर्कात रहा. तसेच आपल्याला लागणारी नियमीत औषधे सतत जवळ बाळगत चला. कारण नसताना डॉक्टर्सच्या जाळ्यात अडकू नका किंवा औषधांच्या व्यसनात गुरफटू नका.

4) तुमच्या जोडीदाराची काळजी घेत चला. त्यांच्यासाठी उत्तमोत्तम वस्तु व प्रेझेन्ट्स आणत जा. कारण एक ना एक दिवस तुमच्यातील एकजण आधी जाणार आहे याची जाणीव ठेवा. हाती असलेला पैसा दोघांनी मिळून इन्जॉय करा. कारण एकट्याने पैसा इन्जॉय करणे कठीण असते.

5) छोट्या छोट्या गोष्टींवरून उगीच डोक्याला त्रास करून घेऊ नका. तुम्ही आयुष्यात पुष्कळ उन्हाळे पावसाळे बघीतले आहेत. तुमच्या मनात काही सुखी आठवणी आहेत तर काही दुःखी, मनाला यातना देणार्याा आठवणी पण आहेत. पण लक्षात ठेवा, तुमचा ‘आज’ सर्वात महत्वाचा आहे. त्यामूळे भूतकाळातील वाईट आठवणींमूळे, तसेच भविष्यकाळातील चिंतेमुळे तुमचा ‘आज’ खराब होऊ देऊ नका. छोट्या छोट्या गोष्टी आपोआप सरळ होतील.

6) तुमचे वय काहिही असो, प्रेम करायला शिका. तुमचा जोडीदार, तुमचे कुटुंब, तुमचे शेजारी, तुमचे आयुष्य यावर प्रेम करायला लागा. लक्षात ठेवा जोपर्यंत माणसाची बुद्धी शाबूत असते व मनात प्रेमाचा ओलावा असतो तोपर्यंत माणूस वृद्ध होत नसतो.

7) स्वतःविषयी अभीमान बाळगा. तो अंतरबाह्य असुदे. वेळच्यावेळी कटींग सलूनमध्ये जाऊन केस कापून घ्या. डेन्टिस्टकडे जा. आवडत्या पावडरी, पर्फ्युम्स वापरायला संकोच करू नका. कपडे निटनेटके ठेवा. बाहेरून तुम्ही जितके चांगले रहाल तेवढे आतून समाधानी असाल.

8) तुम्हाला फॅशन करायची असेल तर खुषाल करा. वृद्ध मंडळींसाठी नवीन फॅशन्स काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही थोडे फॅशनेबल राहिलात तर तरुणांना सुद्धा आवडाल.

9) आपले ज्ञान व माहिती अद्ययावत ठेवा. वर्तमानपत्रे वाचत जा. टि. व्ही. वरील बातम्या बघत जा. सोशल नेटवर्कींग साइटचे सभासद व्हा. तुम्हाला कदाचीत तुमचे जुने मित्र किंवा मैत्रीणी परत भेटतील. कनेक्टेड रहा. यामधे पण मोठा आनंद आहे.

10) तरुणांचा व त्यांच्या मतांचा आदर करा. कदाचीत तुमच्या व त्यांच्या विचारात फरक असू शकेल. पण तेच उद्याचे भविष्य आहेत. त्यांना सल्ला द्या, मार्गदर्शन करा आणि ते सुद्धा त्यांनी मागीतले तरच. उगीच च्या उगीच त्यांचेवर टिका करू नका किंवा त्यांचे दोष काढत बसू नका. कालच्या शहाणपणाला आजच्या जगातही तेवढेच महत्व आहे याची त्यांना जाणीव करून देत चला.

11) ‘आमच्या वेळी असे होते, आमच्यावेळी तसे होते’ असे शब्दप्रयोग अजीबात करू नका. कारण तुमची वेळ आत्ताची आहे, कालची नव्हे. त्यामूळे काल काय घडले हे सतत तोंडावर फेकून मारत जाऊ नका. आत्ताचे आयुष्य आनंदात कसे घालवायचे याचा विचार करा.

12) बहुतेक मंडळी वृद्धत्व आले म्हणून रडत बसतात. फारच थोडी मंडळी वृद्धत्वाचा आनंदाने स्विकार करतात. आयुष्य फार छोटे आहे. त्यामूळे असे करू नका. नेहमी आनंदी लोकांच्या संगतीत रहाण्याचा प्रयत्न करा. त्यामूळे तुम्हालाही आनंद वाटेल. निराश, दुःखी, रड्या लोकांपासून दूर रहा. लक्षात ठेवा दुःखी व रडी माणसे कोणालाच आवडत नसतात. आनंदी व चिअरफूल माणसेच लोकांना आवडत असतात.

सुरुवात छोटी करा, पण...

ज्याला लढायचे माहीतच नाही, त्याची जीवनाच्या लढाईत माती झाल्याशिवाय रहात नाही.  छत्रपती शिवरायांनी संभाजी महाराजांना वयाच्या आठव्या वर्षी आग्र्याच्या भेटीसाठी बरोबर नेले आणि येताना  मथुरेत ठेवून स्वतः राजगडावर आले . कल्पना करा त्यावेळी संभाजीमहाराज  एकुलते एक पुत्र होते, संपर्काचे कोणतेही साधन नसताना हजारो मैल दूर आपल्या पुत्राला शत्रूच्या मुलखात सोडण्यसाठी किती मोठे धाडस करावे लागले असेल ? औरंगजेबासारख्या वादळाला तोंड द्यायचे असेल तर सरावसुध्दा त्याच तोडीचा अगदी लहानपणापासून करावा लागला आहे .आज जवळपास सगळीच मुले व मुली एकुलत्या एक आहेत, त्यांना संकटाची साधी झळही आपण बसू देत नाही. कदाचित आपण त्यांचे नुकसान करत आहोत, त्यांना पंगु बनवत आहोत. पोटाची भूक माणसाला व्यवहार शिकवते आणि किर्तीची भूक माणसाला झगडणे शिकवते.  अन्नाची चव पदार्थात नसते तर ती भूकेत असते. भूक लागायच्या आधीच अन्न मिळाले तर त्या अन्नाची किंमत कधीच कळत नाही. नेमके तेच आज आपण करत आहोत.किर्तीची भूक निर्माण करावी लागते , त्यासाठी उत्तुंग धेय्य समोर असावे लागते, 

अमाप लोकप्रियता आणि कर्तुत्वाचा हिमालय उभी केलेली माणसे सतत दृष्टीसमोर असावी लागतात.

तरच ही भूक निर्माण होते . आपल्याला पोटापुरते आहे काही काळजी करायचे कारण नाही. ही विचारधारा आत्मविश्वासाने सळसळत्या तारूण्यात झेप घेऊ पाहणाऱ्या तरूणाईच्या पायातील बेडी आहे . ज्या पालकांनी ही बेडी आपल्या मुलांच्या पायात घातली, त्यांना लढणे माहीत होत नाही आणि वादळी संकटात अशी मुले तग धरत नाहीत .शहाजीराजे आणि मॉंसाहेब जिजाऊ यांना काय कमी होते ?  त्यांनी जर शिवरायांच्या पायात  ही बेडी टाकली असती तर काय झाले असते ?  ज्यांनी आपल्या मुलांच्या पायात अशा बेड्या टाकल्या , त्यांना  शिवरायांच्या संरक्षणाची गरज भासली, मॉंसाहेब जिजाऊ आणि शहाजीराजांनी ही बेडी तोडली, त्यांच्या पुत्राने इतिहासात सुवर्णपाने लिहायला भाग पाडले.जीवनाची खरी पुंजी ही  झगडण्याची आणि झुंजण्याची कला आहे, तीच वारसाहक्काने मुलांना द्यायला हवी.

आपल्या कुलदीपकाचा प्रकाश हवा असेल तर ही कला म्हणजे त्याच्या चमकण्याचे इंधन आहे, हे कधीच विसरू नका. आज कोणतेच क्षेत्र सुरक्षित नाही ,  तुम्ही कितीही तयारी करून ठेवा , जो झुंजतोय ,लढतोय तोच टिकणार आहे. हात बांधून उभा राहणारा  दुसऱ्याची शिकार होणार आहे . 

मॉंसाहेब जिजाऊ शिवरायांना आशिर्वाद देताना दररोज म्हणायच्या, राजे दौलत चढती करा ! हे झगडायला शिकवणे आहे. चारशे वर्षापूर्वी त्या मातेला कळाले होते, बापाच्या कमाईवर जगणाऱ्या पोराला समाज किंमत देणार नाही . आजही आम्हाला हे समजलेले नाही, मुले लग्नाला आली तरी आम्ही त्यांची काळजी करत आहोत आणि त्यापेक्षाही वाईट म्हणजे त्यांची काळजी घेत आहोत.

     स्वतःला आवडणारा रस्ता निवडा,मार्ग निश्चित करा.ध्येय निश्चित करा.मग हा निवडलेला रस्ताच जर इनामदारीचा व सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही. भले कोणी सोबत असो वा नसो.फक्त चालण्यात सातत्य हवे. सुरुवात नेहमीच छोटी करावी पण शेवट मात्र एक सोहळा बनला पाहिजे,आयुष्यात  सावकाश चाला काही हरकत नाही, पण चालताना अस चालायचं की आपल्या कर्तृत्वाची,आणि  मनमिळावू स्वभावाची, आत्मिक समाधान लाभलेल्या मनाची, आणि दैदिप्यमान यशाची सोन पावले सदैव  मागे उमटली पाहिजे. (संकलन)

Thursday, July 23, 2020

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणातील १० नियम

---------------------------------------------
 नियम १ – आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करुन घ्या.
 नियम २ – जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा.
नियम ३ – कॉलेजमधुन बाहेर पडल्या पडल्या पाच आकडी पगाराची अपेक्षा करु नका. एका रात्रीत कोणी वाइस प्रेसिडंट होत नाही, त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात .
नियम ४ – आज कदाचीत तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भितीदायक वाटत असतील, कारण अजुन बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाय.
 नियम ५ – तुम्ही केलेली चुक ही सर्वस्वी तुमची चुक आहे आणि तुमचा पराजय हा सर्वस्वी तुमचा पराजय आहे. कोणाला दोष देऊ नका, झालेल्या चुकीपासुन धडा घ्या आणि पुढे चालत रहा.

Monday, July 13, 2020

इतरांपेक्षा वेगळे करा

तुमच्या भविष्याविषयी बोलण्याआधी मला काही काळ भूतकाळात डोकवायला आवडेल. १९१८ च्या प्रारंभी नौदलात सहाय्यक सचिव असणारा ३६ वर्षांचा तरुण परदेशी निघाला होता. युरोपियन युद्धासाठी अमेरिकेच्या नवख्या सैनिकांना सज्ज करण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकण्यात आली होती. दुसरीकडे अवघ्या ३0 वर्षांचा, शोधप्रबंध सादर करण्याची स्वप्नं रंगवणारा, युद्धामुळे चिरडला गेलेला सुधारणावादी कवी- अध्यापक स्वत:मध्ये दंग होता. पण शिक्षक आणि बँकेतला कर्मचारी अशा दोन परस्परविरोधी नोकर्‍यांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न तो करत होता.

Wednesday, July 8, 2020

मिस्टर आणि मिसेस लेलँड स्टॅनफोर्ड

 कधी माणसाची ओळख करण्यात आपण किती मोठी चूक करतो, याचे एक मोठे उदाहरण पहा. अमेरिकेतील जगप्रसिद्ध हॉर्वर्ड विद्यापीठाच्या प्रेसिडेंटना भेटण्यासाठी म्हणून एक वृद्ध जोडपे अपॉईंटमेंट न घेता भेटायला आले. त्या जोडप्याचा वेष नुसताच साधा नव्हता, तर गबाळाही होता. म्हाताऱ्याबाईंनी घातलेला फॉक अगदी साधा, चुरगळलेला आणि थोडासा मळलेला, तर म्हाताऱ्याबुवांनी घातलेला सूटही घरी शिवलेला, ढगळ, गबाळा आणि इस्त्री न केलेला होता. प्रेसिडेंटच्या केबिनबाहेर पॉश काऊंटरवर बसलेल्या सेक्रेटरीकडे ते जोडपे आले. 'आम्हाला प्रेसिडेन्ट साहेबांची फक्त दहा मिनिटेच भेट हवी आहे! मिळेल का?' त्या आजीबाईंनी नम्रपणे विचारले.

Monday, July 6, 2020

रागावर ताबा ठेवा

'राग हा माणसाचा शत्रू आहे' हा सुविचार आपण अगदी
लहानपणापासून शाळेत फळ्यावर लिहीत आलेलो आहोत. हा शत्रू सगळ्यात जास्त नुकसान करणारा असतो, हे ही आपल्याला माहीत असते. कुठल्याही मोठ्या आर्थिक नुकसानापेक्षा, या रागामुळेच अनेक नाती, अनेक संबंध अगदी कायमचे नष्ट होतात. अविचाराच्या हातात हात घालून येणारा हा शत्रू माणसाची सद्सद विवेक बुद्धी गहाण ठेवण्यास भाग
पाडतो. मनासह शरीरावरही वाईट परिणाम करणारा हा राग का येतो माणसाला इतका? 'कळतं पण वळत नाही' असेही घडते, पण राग काही शांत होत नाही माणसाचा. अपयश, काही गोष्टी कारणीभूत असतात

Thursday, May 28, 2020

स्वतः ला बदला,पण थांबू नका

बहुतांश लोक अपयशी होतात,त्याला ते स्वतः जबाबदार असतात, कारण त्यांनी स्वतः ला बदललेले नसते.त्यांना स्वतः मध्ये बदल करावासा वाटत नाही. पण खरे वास्तव असे की, परिवर्तनाशिवाय यश हाताला लागत नाही. परिवर्तनामुळे आपल्या आयुष्याला फायदा होतो. काही माणसे खड्ड्यात असतात. खड्डा खोदण्याचे काम करीत असतात. ते आपल्या कामाची पद्धत बदलत नाहीत. त्यामुळे ते अडचणीत सापडू शकतात. काही माणसे आपल्या आपल्या म्हणण्यावर ठाम असतात.त्यांना बदल नको असतो.

Tuesday, May 26, 2020

चुका झाल्यावर काय करायचं?

म्हटलं जातं की मनुष्य प्राणी हा चुकांचा पुतळा आहे.  चुका त्याच्या हातून होणार नाहीत तर कुणाच्या हातून होणार? परंतु, चुका झाल्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती जो सुधारतो,तोच जीवनात यश प्राप्त करू शकतो.त्यामुळे चूक झाली म्हणून घाबरू जायचं नाही किंवा हताश व्हायचं नाही.परिस्थितीला सामोरे जाऊन चूक का झाली, याचा अभ्यास करायचा, त्याची कारणमीमांसा शोधायची.असे केल्याने पुन्हा कधी चुका होणार नाहीत.

Sunday, May 24, 2020

चांगला लीडर हृदयातून बोलतो,हृदयात उतरतो

माणसं नेहमी विचारतात की, एक चांगला वक्ता आणि चांगला लीडर यांच्यात काय फरक आहे? त्यांच्यात अंतर असतं मानसिकतेचं! एका चांगल्या वक्त्याचे अस्त्र-शस्त्र फक्त शब्द, त्याचे विचार असतात.पण एक चांगला लीडर सर्वात पहिल्यांदा शब्द आणि विचारांचा आपल्या जीवनात अंगीकार करतो आणि त्यानंतरच तो दुसऱ्यांना अंगीकार करायला सांगतो.  तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का बघा!तुम्ही ती तुमच्या लहानपणी ऐकली असेल. एक स्त्री आपल्या मुलाला घेऊन महात्मा गांधीजींकडे घेऊन जाते.

Saturday, May 23, 2020

यशासाठी पहिल्यांदा स्वतः ला 'इम्प्रेस' करा

जे व्यक्तिमत्त्व दुसऱ्याला खऱ्या अर्थानं प्रभावित करतं, त्यानं पहिल्यांदा स्वतःला प्रभावित करण्याचा सराव केलेला असतो. हा सराव अशा सवयींचा आहे, जी आपली मानव होण्याची निशाणी आहे. या सवयीच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असते, म्हणजे यशस्वी आणि श्रेष्ठ जीवन जगण्यासाठी आपल्याला आपल्या काही खास सवयींवर काम करावं लागेल. कोणत्याही व्यक्तीची ओळख त्याच्या मूळ स्वभावामुळे होते.

शंका घेतला की मिळणार नाही यश

जीवनात पुढं जाण्यासाठी माणूस प्रयत्न करत असतो आणि या प्रयत्नांवर शंका घेतल्यानं सगळ्या प्रयत्नावर पाणी फिरतं. शंका माणसाचा उत्साह कमी करतं. शंकेमुळे माणूस योग्य वेळ येण्याची वाट पाहात राहतो. त्याला वाटतं की, योग्य संधी आल्यावर आपण काम करू. जी माणसं आपल्या योग्यतेवर शंका घेतात, ती माणसे नेहमी द्विधा मनस्थितीत असतात. काम सुरू करू का नको, असे शंकाकारी प्रश्न त्यांच्या मनात सतत घोळत असतात. ही माणसं सतत काम टाळत असतात. त्यांना नेहमी वाटत राहतं की, अजून योग्य वेळ आली नाही. ते आपली दिशा निश्चित करू शकत नाहीत आणि मग ते इकडे-तिकडे वायफट भटकत राहतात.

प्रिय व्यक्तीपासून दूर राहिल्यानं प्रेम वाढतं

नात्यामध्ये प्रेम असायला हवं,पण एकमेकांशी सतत जोडून राहणं चुकीचं आहे. अशा परिस्थितीत नातेसंबंधावर त्याचा परिणाम होतो. आपसातील ओढीवर त्याचा परिणाम होऊन असं वाटायला लागतं की, नातं फक्त निभावलं जात आहे. आपल्या नात्यांमध्ये अगदीच जवळीक निर्माण करायची असेल तर अधे-मधे त्यातील दुराव्याचा स्वाददेखील चाखला पाहिजे. अमेरिकेतील वर्तणूक विज्ञानाचे शास्त्रज्ञ डॉ. जोसेफ जे प्लाउड म्हणतात की, आपल्याला वाटत असतं की, आपली प्रिय व्यक्ती सतत आपल्यासोबत राहायला हवी. पण यात आपण इतके गंभीर होतो की, त्याला अप्रिय बनवून टाकतो. सोबत राहून व्यक्तिस्वातंत्र्य मिळत नसेल तर नात्यात बिघाड निश्‍चित मानायला हवं.

Thursday, May 21, 2020

निर्णय घेताना 'आतला आवाज' ऐका

आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात असे खूप काही क्षण येतात की, आपल्याला पटकन निर्णय घेणं भाग असतं. अशा वेळेला निर्णय चुकीचा आहे की बरोबर आहे, याला महत्त्व नसते, निर्णय घेतला जाणं महत्त्वाचं असतं. जर तुम्ही योग्य वेळेला निर्णय घेतला नाहीतर तुम्ही अनेक संधीला मुकाल. यामुळे दोन प्रकारच्या शक्यता आहेत. एक तर तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर तुमचा फायदाच होईल आणि दुसरे म्हणजे तुमचा निर्णय चुकला असेल तर तुम्हाला त्यातून एक शिकवण मिळेल, जी तुमच्या पुढच्या निर्णयाला उपयोगाची ठरू शकते. आयुष्य छानपैकी जगायचं असेल तर निर्णय घेण्याची कला आत्मसात केली पाहिजे. यासाठी काही खास प्रयत्न करणे गरजेचे आहे.

Wednesday, May 20, 2020

वेळ वाया घालवू नका, त्याच्यावर छाप सोडा

जर वेळ खूपच मर्यादित आहे आणि ते तुमच्या कंट्रोलमध्ये नाही , असे तुम्हाला वाटत असेल तर त्याचे योग्य असे प्लानिंग करा. नाही तर वेळ वाळूसारखी तुमच्या हातून निसटून जाईल. जर तुम्ही वेळेची पर्वा केली नाहीतर हीच वेळ तुम्हाला त्रासही देऊ शकते. वेळेला योग्य प्रकारे मॅनेज करायला हवं, तेव्हाच तुम्ही जीवनाचा आनंद लुटू शकाल. सध्याच्या प्रत्येक क्षणाचा योग्य वापर करत राहिलात तर भविष्य तुमच्यासाठी सुंदर असेल. आपण इथे हेच पाहणार आहोत की, वेळेचा उपयोग आपल्या फायद्यासाठी कसा करायचा.

इतिहास पाठ नाही करायचा,रचायचा!!

या जगात दोन प्रकारची माणसे असतात. त्यातले एक असतात, ते आयुष्यभर इतिहास पाठ करत असतात. पण दुसऱ्या प्रकारचे लोक आपलं संपूर्ण आयुष्य इतिहास रचण्यात घालवत असतात. आपण कोणत्या प्रकारचा इतिहास घ्यायचा, हे आपल्या हातात आहे. बघा, अशी कोणती गोष्ट आहे, जी लोकांना इतिहास बनवायला विवश करते? अशी कोणती शक्ती आहे, जी तुम्हाला दुसऱ्यांपेक्षा वेगळं बनवते? जिद्दी माणूसच इतिहास रचत असतो.

एकाग्रतेने होते काम


अनेक लोकं स्वतः विषयी तक्रार करत असतात. त्यांना कुठल्याच गोष्टीत एकाग्र होता येत नाही. त्यांचं मन भटकत राहतं. एक गोष्ट मात्र खरी आहे, ती म्हणजे, माणसानं एकाद्या गोष्टीवर एकाग्र होऊन काम केलं की,  त्याचं यश निश्चित आहे. एकाग्रतेसाठी माणसाला आपल्या मनाला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. एकाग्रतेसाठी सराव आवश्यक आहे, अभ्यास गरजेचा आहे. यानंतर मात्र मग कुठली समस्या येणार नाही.
कित्येक विद्यार्थ्यांच्याबाबतीत घडतं की, ते पुस्तक उघडून बसतात. काही वेळ वाचतात आणि मग मन भटकायला लागतं. ते विषयाच्याबाबतीत एकाग्र होऊ शकत नाहीत.