माणसं नेहमी विचारतात की, एक चांगला वक्ता आणि चांगला लीडर यांच्यात काय फरक आहे? त्यांच्यात अंतर असतं मानसिकतेचं! एका चांगल्या वक्त्याचे अस्त्र-शस्त्र फक्त शब्द, त्याचे विचार असतात.पण एक चांगला लीडर सर्वात पहिल्यांदा शब्द आणि विचारांचा आपल्या जीवनात अंगीकार करतो आणि त्यानंतरच तो दुसऱ्यांना अंगीकार करायला सांगतो. तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का बघा!तुम्ही ती तुमच्या लहानपणी ऐकली असेल. एक स्त्री आपल्या मुलाला घेऊन महात्मा गांधीजींकडे घेऊन जाते.
आणि त्यांना म्हणते की, माझा मुलगा खूप गूळ खातो, कृपा करून त्याला समजावून सांगा. महात्मा त्या स्त्रीला काही दिवसानंतर यायला सांगतात. कारण महात्माजींना गूळ खाण्याची सवय होती. त्यामुळे ते पहिल्यांदा आपली सवय बदलतात. नंतर जेव्हा ती स्त्री येते, तेव्हा तिच्या मुलाला जवळ बोलावतात आणि अति गूळ खाण्याची सवय सोडायला सांगतात. त्याचे दुष्परिणाम सांगतात. सांगायचा मुद्दा असा की, नेता म्हणजे लीडर जे सांगतात, ते अगदी हृदयापासून सांगतात. आणि त्यामुळेच ते आपल्या हृदयात उतरतात.
स्वतःच्या आचरणात बदल
इतिहासात महापुरुषांची जितकीही उदाहरणं पाहाल,तेव्हा एकच गोष्ट आपल्या लक्षात येईल की त्यांनी आपल्या विचारांना पहिल्यांदा स्वतः वर अप्लाय केला आहे. मग ते श्रीराम असतील, कृष्ण असतील, बुद्ध असतील किंवा महावीर, गांधी असतील. सुभाषचंद्र बोस, माटीन लुथर किंग या सगळ्यांच्या बोलण्याला वजन असते, सांगण्यातून प्रेरणा मिळते आणि हृदयात उतरणारी विशेषता असते. जे सांगतात,ते पहिल्यांदा आपल्या जीवनात उतरवलेले असल्याने त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळते. त्यामुळेच त्यांना इतरांना सांगण्याचा अधिकार मिळतो. स्टीव्ह जॉब्स यांचे जीवन नवयुवकांसाठी प्रेरणादायी आहे,कारण ते स्वतः 18 ते 20 तास काम करतात. फेसबुक चा संस्थापक मार्क जुकरबर्ग आपल्या प्रोजेक्ट्समध्ये झपाटल्यासारखे काम करतात. विश्व प्रसिद्ध अँकर ओफ्रा आयुष्यात संघर्ष करून पुढे आली आहे.
वारे बफेट 500 पानं रोज वाचतात आणि भाषणाअगोदर फक्त आऊटलाईन बनवतात. ते मंचावर बोलताना अगदी सहज वावरतात आणि श्रोत्यांवर आपली सहज छाप सोडतात. प्रत्येक यशस्वी माणूस आपली शैली स्वतः बनवतो कारण तो स्वतः ती शैली दिवसरात्र जगलेला असतो. ज्यावेळेला तो ते इतरांना सांगतो, तेव्हा ते अनुकरणीय बनते.
वास्तविक खरी ताकद शब्दांत नाही तर त्याच्या मागे लपलेल्या कर्मात आहे. त्याच्या जीवन दर्शनमध्ये आहे, काही शब्द किंवा विचार यांच्या स्मरण करण्याने आपल्यासमोर त्या महापुरुषांची छबी उभी राहते. कारण त्यांनी त्या शब्दांना जीवन देण्यासाठी आपले जीवन पणाला लावलेले असते. जर तुम्हाला जगात बदल घडवायचा असेल,तर पहिल्यांदा स्वतः ला बदलले पाहिजे. विस्तावाची प्रखरता दुसऱ्याला सांगायची असेल तर पहिल्यांदा तो आपल्या बोटांनी पकडायला हवा.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

No comments:
Post a Comment