Wednesday, May 20, 2020

वेळ वाया घालवू नका, त्याच्यावर छाप सोडा

जर वेळ खूपच मर्यादित आहे आणि ते तुमच्या कंट्रोलमध्ये नाही , असे तुम्हाला वाटत असेल तर त्याचे योग्य असे प्लानिंग करा. नाही तर वेळ वाळूसारखी तुमच्या हातून निसटून जाईल. जर तुम्ही वेळेची पर्वा केली नाहीतर हीच वेळ तुम्हाला त्रासही देऊ शकते. वेळेला योग्य प्रकारे मॅनेज करायला हवं, तेव्हाच तुम्ही जीवनाचा आनंद लुटू शकाल. सध्याच्या प्रत्येक क्षणाचा योग्य वापर करत राहिलात तर भविष्य तुमच्यासाठी सुंदर असेल. आपण इथे हेच पाहणार आहोत की, वेळेचा उपयोग आपल्या फायद्यासाठी कसा करायचा.

वेळ उशीर करत नाही
बेंजामिन फ्रॅंकलिन म्हणाले होते की, 'तुम्ही उशीर करू शकता, वेळ उशीर करत नाही.' वेळ वेगाने धावतो. तुम्हाला जे हवं आहे, ते आतापासूनच मिळवायला सुरुवात करा. उद्या आणि परवाच्या भानगडीत तुमच्या हाताला काहीच लागणार नाही. सुरुवात करा, मग वेळ तुम्हाला सोबत करायला येईल. तुम्हाला मदत करेल. कोणतेही काम असू द्या, सगळ्यात चांगली वेळ आता आहे. त्यामुळे उशीर करू नका, कामाला लागा.

एन्जॉयसाठी द्या वेळ
बरटेंड रसेलने म्हटले होते की, 'तुम्ही एन्जॉय करण्यासाठी जो वेळ घालवता, ती वेळ वाया गेली असे म्हणता येत नाही.' या गोष्टीकडे अधिक लक्ष द्या की, तुम्ही तुमचा वेळ कशाप्रकारे घालवता. तुम्ही असा प्रयत्न करा की, तुमचा वेळ खर्च केल्याने तुमची जीवनाची व्हॅल्यू वाढेल आणि आजूबाजूच्या लोकांमध्ये आनंद येईल. हेच जीवन आणि वेळ करण्याचे ध्येय असायला हवे. एक गोष्ट लक्षात ठेवा, दुसऱ्याला आनंद मिळेल, असे काम एन्जॉय करायला शिका.

वेळ खराब करू नका
ब्रूस ली म्हणायचा की, 'जर तुम्ही तुमच्या आयुष्यावर प्रेम करत असाल तर वेळ वाया घालवू नका.' तुम्हाला तुमच्या दिवसाचे प्लानिंग अशा प्रकारे करायला हवे की, तुम्ही तुमच्या प्रत्येक महत्त्वपूर्ण कामाला योग्य वेळ देऊ शकाल. तुम्हाला काम आणि मनोरंजन या दोन्हींसाठी वेळ देता आला पाहिजे. तुम्हाला विचारांना आणि कामांना वेळ देता आला पाहिजे. तुम्ही घेण्यासाठी-देण्यासाठी वेळ दिला पाहिजे. सहानुभूती आणि आभार व्यक्त करण्यासाठी वेळ देता आला पाहिजे. प्रत्येक दिवस जीवनातल्या एका छोट्याशा रुपासारखं घालवता आला पाहिजे. तुम्हाला पूर्ण दिवसाचा सर्वश्रेष्ठ सारांश मिळवता आला पाहिजे.

वेळ कोणी चोरू नये
जेम्स लेंडल बासफोर्ड यांनी म्हटले होते की, 'जर कुणी व्यक्ती तुमची वेळ चोरत असेल, तर लक्षात ठेवा की तो तुमचा बहुमोल खजाना चोरत आहे.' तुम्ही तुमच्या जीवनाचा टाईमकीपर स्वतः आहात. जे लोक तुमचा वेळ खराब करतात, त्यांच्यापासून लांब राहा. त्यांना सूचना द्या की, तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या कामात व्यस्त आहात. तुमच्याजवळ असलेल्या वेळेबाबत तुम्ही नेहमी दक्ष राहिले पाहिजे.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कोणतेही काम भविष्यावर सोडता, ते काम महत्त्वपूर्ण राहत नाही. आणि ते काम कधी पूर्ण होईल, याबाबतही मनात शंका निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे प्रत्येक काम वेळच्यावेळी पूर्ण करण्याची सवय लावून घ्या.

No comments:

Post a Comment