आजकाल कॉलेजचे शिक्षण सुरू असताना पार्ट टाईम जॉब करणार्यांची संख्याही अधिक आहे. त्याच बरोबर कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर नोकरी लागावी असाही अनेकांचा प्रयत्न असतो. मात्र, एकदा नोकरी लागली आणि हातात पैसा खेळू लागला की, बचतीपेक्षा चैनीवर बरेच पैसे उडवण्याकडे अनेकांचा कल असतो. पण असं करून चालण्यासारखं नाही. गरज नसताना ते खर्च करणे घातक ठरू शकतं. प्रयत्न केला तर खर्च कमी करु शकता. कसे वाचवायचे पैसे?
दिवसभराच्या छोट्या खर्चांची नोंद ठेवा. चहाच्या कपापासून सुरूवात करा. दिवसभरात कशाकशावर खर्च करता हे जाणून घ्या. घरी जाण्यासाठी खाजगी टॅक्सीचा वापर किती वेळा करता हे तपासा. मनोरंजनासाठी होणार्या खर्चाचा विचार करा. पिकनिकला जाण्यासाठी किंवा छंद जोपासण्यासाठी होणार्या खर्चाचा ठेवा. भविष्यात गाडी, घर घ्यायचं किंवा पुढच्या शिक्षणासाठी कर्ज घ्यायचं तर स्वत:चं क्रेडिट प्रोफाइल तयार करा. सुरूवातीला एखादं क्रेडिट कार्ड घ्या. वैयक्तिक कर्जही घेता येईल. कर्जाचे हप्ते तसंच क्रेडिट कार्डाचे हप्ते वेळेत भरा. यामुळे सिबिल स्कोअर वाढेल आणि कर्ज सुलभपणे मिळू शकेल. आर्थिक विषयांबद्दल माहिती घ्या. तुमचं ज्ञान वाढवा. गुंतवणूक कशी करायची, किती करायची याबाबत जाणून घ्या. त्याचा फायदा होईल.
No comments:
Post a Comment