हेन्री फोर्ड खूप मोठे उद्योगपती होते. त्यांनी अमेरिकेत फोर्ड मोटर कंपनीची स्थापना केली. एकदा एका भारतीय उद्योगपतीला मोटार कारखाना काढण्यापूर्वी हेन्री फोर्डला भेटायचे होते. अमेरिकेत पोहोचल्यानंतर त्यांनी हेन्री फोर्डशी संपर्क साधला. फोर्डने त्यांना संध्याकाळी सहा वाजता त्याच्या घरी यायला सांगितले. ठरलेल्या वेळी तो उद्योगपती त्यांच्या घरी पोहोचला तेव्हा त्याला एक व्यक्ती भांडी धुताना दिसली. त्याने उद्योगपतीला गेस्ट रूममध्ये बसण्यास सांगितले. भांडी धुवून झाल्यानंतर ती व्यक्ती गेस्ट रूममध्ये आली आणि 'मला हेन्री फोर्ड म्हणतात' असं म्हणत स्वतःची ओळख करून दिली. ऐकून भारतीय उद्योगपती थक्क झाला. तो म्हणाला, 'एवढी मोठी व्यक्ती असूनही तुम्ही सामान्य माणसांप्रमाणे स्वतःचे काम स्वतः करता. या कामांसाठी तुम्ही नोकर का ठेवत नाही?'
फोर्डने उत्तर दिले, 'मी माझे स्वतःचे काम करतो. मी ही माझी सवय सोडू शकत नाही. मला माझे काम करण्यात आनंद मिळतो. स्वतःच्या हातांनी केलेल्या मेहनतीमुळे आज मी फोर्ड कंपनीचा मालक झालो आहे.अशा अत्यंत श्रीमंत व्यक्तीचा साधेपणा पाहून भारतीय उद्योगपती भारावून गेला.

No comments:
Post a Comment