पूर्वी केवळ मंदिरामंदिरांमधून सादर होणारी भरतनाट्यम् नृत्यकला आता आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग म्हणून सादर होताता दिसत आहे. कर्नाटक संगीतावर नाचली जाणारी ही नृत्यशैली असून, आता संस्कृत स्तोत्र, मराठी- हिंदी गाणी आणि अगदी परदेशात इंग्रजी गाण्यांवरही भरतनाट्यम् नृत्यरचना सादर होताना आपल्याला दिसतात. त्यामुळे या क्षेत्रात आवड असणार्यांसाठी उज्ज्वल करिअर करता येणार आहे. भरतनाट्यम् नावामागची गोष्ट-भरतनाट्यम् या नावाचा विचार करता भ वरून भाव म्हणजे सगळे नवरस, र वरून राग (संगीतातला) आणि त वरून ताल अशा तीन अक्षरांच्या एकत्रित मिलाफाने भरत हा शब्द तयार झाला. भरतनाट्यम् मध्ये नाट्य म्हणजेच अभिनयासुद्धा तितकाच महत्त्वाचा असल्याने त्याला पुढे नाट्यम हा शब्द जोडला गेला.
असा घडला नृत्यशैलीचा प्रवास - मुलांना शाळेत जितक्या साहजिकपणे पाठवलं जातं,तसंच अगदी साहजिकपणे मुलीला नाच शिकवायला पाठवणारा एक अख्खा प्रदेश आपल्याकडे आहे. इतका प्रगत देश आहे मारत! भारतात विकसित झालेल्या ठरावीक अशा महत्त्वाच्या नृत्यशैलींपैकी भरतनाट्यम एक आहे. तामिळनाडूतील प्राचीन अशी ही नृत्यशैली. देवदासी प्रथेतून जन्माला आलेली आणि पुढे बराच मोठा प्रवास करून रंगमंचीय सादरीकरणापर्यंत ही कला पोहोचली,
या आहेत करिअरच्या संधी- ●करिअर म्हणून विचार करता दोन महत्त्वाचे मार्ग समोर येतात, एक म्हणजे अर्थात स्वत:चे क्लासेस सुरु करणे, दुसरं म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या नृत्य रचनेचे वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सादरीकरण करणे.●भरतनाट्ममचे काही कोर्सेस किंवा वर्कशॉपस् घेता येतात. त्याचबरोबर, नवीन शैक्षणिक धोरणामुळे अनेक शाळांमध्ये पारंपरिक भरतनाट्यम् शिकवणारे शिक्षक म्हणून काम करता येईल. ●भरतनाट्यमकडे व्यायामाचा एक उत्तम प्रकार म्हणूनही बघता येऊ शकते. याच्या कार्यक्रमांसाठी गायनाची उत्तम साथ लागते, तुम्ही जर नृत्याबरोबरच कर्नाटक संगीताचे शिक्षण घेतले तर गायक म्हणून प्रोफेशनचा दुसरा मार्गदेखील खुला होतो. केवळ जती किंवा बोल टाळम् बर म्हणण्यासाठीसुद्धा परीक्षांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये संधी मिळू शकते. ●तुम्ही विशारद पूर्ण असाल तर परीक्षक म्हणून तुम्हाला परीक्षा घेण्यासाठी सुद्धा जाता येते. ●याचप्रमाणे भरतनाट्यम् व टुरिझम, भरतनाट्यम् व इतर कला, भरतनाट्यम व पत्रकारिता, भरतनाट्यम् आणि साहित्य अशा उत्तम मिलाफाने व्यवसायाच्या संधी निर्माण करता येतील. ● तुम्हाला मेकअप करता येत असेल तर भरतनाट्यमचा मेकअप करणे, तुम्ही जर टेलर असाल तर भरतनाटम चे ड्रेस शिवणे अशा पूरक संधीसुद्धा मिळू शकतात,
पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट-खाजगी क्लासेसमध्ये भरतनाटयम् शिकण्याबरोबरच वेगवेगळ्या विद्यापीठांमधून आता भरतनाट्यममध्ये पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकता येतो आणि पीएचडी देखील करता येते.
-तेजस्विनी गांधी
भरतनाट्यम क्षेत्रातील यशस्वी कलाकार
No comments:
Post a Comment