प्राणिशास्त्र हे केवळ प्राण्यांशी मर्यादित शास्त्र नसून त्याची व्यापकता मोठी आहे. प्राणिशास्त्राअंतर्गत सिस्टेमॅटिक्स, वर्गीकरण, मानव आणि प्राणी शरीरविज्ञान, वैद्यकीय प्राणिशास्त्र, परजीवीशास्त्र, कीटकशास्त्र, हिस्टोलॉजी, उत्क्रांती, सेल-बायोलॉजी, अनुवंश शास्त्र, आण्विक जीवशास्त्र, टॉक्सिकोलॉजी, इकोलॉजी, पर्यावरण विज्ञान, इम्युनोलॉजी, भ्रूणशास्त्र, जैवतंत्रज्ञान असे हे अफाट क्षेत्र आहे.
प्राणीशास्त्राच्या विविध शाखांमध्ये शिक्षण घेतल्यानंतर करिअरच्या असंख्य संधी आहेत. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उमेदवार एकतर उच्च शिक्षण घेऊ शकतात किंवा ते नोकरी शोधू शकतात. बीएस्सीमध्ये पदवीधरांसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे अनेक पर्याय आहेत. या विद्यार्थ्यांना भारतासह परदेशात अनेक संस्थांमध्ये मागणी वाढत आहे.
या विषयांत घेता येईल पदव्युत्तर-पदवी -प्राणीशास्त्र विषयात पदवी उत्तीर्ण झालेल्यांना प्राणीशास्त्र, मानवशास्त्र, जैवविविधता, बायोडन्फॉरमॅटिक्स, सागरी जीवशास्त्र, आहारशास्त्र आणि पोषण विज्ञान, सार्वजतिक आरोग्य, पर्यावरण शास्त्र, बायोटेक्नॉलॉजी, अप्लाइट प्राणीशास्त्र, बायोकेमिस्ट्री, फोरेत्सिक सायन्स, रेशीम शास्त्र, मत्स्यव्यवसाय, होम सायन्स, विषाणूशास्त्र, मानसशास्त्र, मास्टर ऑफ सायत्स, पॅरामेडिकल, व्यवसाय प्रशासन, क्लिनिकल सायकोलॉजी, भूणशास्त्र या विषयांत मास्ट ऑफ सायन्स ही पदव्युत्तर पदवी घेता येते.
इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेससाठी उपयुक्त - उपयुक्त बीएस्सी प्राणीशास्त्र विज्ञान विद्यार्थ्यांना इंडियन फॉरेस्ट सव्हिसेस परीक्षेत उत्तीर्ण होऊन फॉरेस्ट ऑफिसरपदी नोकरी मिळविता येते. त्यासह एमपीएससी आणि यूपीएससी या स्पर्धा परीक्षेसाठी हा विषय उपयुक्त ठरतो.
नोकरीच्या विविध संधी- पर्यावरणशास्त्र, पर्यावरण सल्लागार, निसर्ग संवर्धन अधिकारी, पर्यावरण शिक्षण अधिकारी, पर्यावरण व्यवस्थापक, संशोधन शास्त्रज्ञ (जीवन विज्ञान), जैववैद्यकीय शास्त्रज्ञ, प्राणिसंग्रहालय Arex, सागरी जीवशास्त्रज्ञ, प्राणी आणि वन्यजीव शिक्षक, प्राणिसंग्रहालय किपर , फॉरेन्सिक asst, Embryologist (IVF-Test tube baby technologist), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तांत्रिक सहायक, क्लिनिकल डॉक्युमेंटेशन सेवा, वैज्ञानिक लेखक, विज्ञान पत्रकार होता येते.
शिंक्षक, प्राध्यापक होऊन करा अध्यापन- पदव्यूत्तर पदवी घेतल्यातंतर नेट, सेट आणि पीएच.डी. करता येते. शाळा किंवा विज्ञान शाखेची कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयात शिक्षक आणि प्राध्यापक म्हणून काम करता येते. यासह संशौधन आणि विकास संस्थांसाठी प्राणीशास्त्रज्ञ / फ्री-लान्स सल्लागार म्हणूनही काम करता
वन्यजीव, जीवशास्त्र, पर्यावरणीय शास्त्रांत करा संशोधन
1. पर्यावरण शिंक्षण केंद्र
२. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमॅट
3. वन्यजीव संरक्षण संस्था, बंगलोर
४. इंडियन डन्स्टिल्यूट ऑफ सायन्स, बंरातोर
5. भारतीय वन्यजींव संस्था, डेहरादून
6. जवाहरलाल नेहरु विद्यापीठ
७. भारतीय पर्यावरण आणि पर्यावरण संस्था
८. जवाहरलाल नेहरु प्रगत वैज्ञानिक संशोधन केंद्र, बंगलोर
शासकीय विंभाग, संस्थांसोबत करा काम
● पर्यावरण आणि वन मंत्रालयाची प्रादेशिक संसाधन केंद्र
● वाइल्डलाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया
● डॉ. सलीम अली स्कूल ऑफ इकोलॉजी
● इंडियन टायगर वेलफेअर सोसायटी
●वाइल्डलाड्रफ ट्रस्ट ऑफ इंडिया
●केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण ( सीझेडए)
●झू आउटरीच संस्था
●वन्यजीव माहिती संपर्क विकास
● बॉम्बे नेंचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस)
● विज्ञान आणि पर्यावरण केंद्र (सीएसइ)
● अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इकोलॉजी अँड पर्यावरण (एटीआरर्ईई)
पदवी घेतल्यानंतर व्हा उद्योजक -पदवीधरांना रेशीम उद्योग, मत्स्यपात्नन, मधमाशी पालन, डेअरी उद्योग, गांडूळ खत उद्योग, पॅथॉलॉजी लॅब, Tissue culture lab, पाणी व माती परीक्षण प्रशोगशाळा यामध्ये स्वत:चा उद्योग सुरू करता येऊ शकतो.
No comments:
Post a Comment